राजकीय बॅनरबाजीला आचारसंहितेचा ब्रेक

By Admin | Published: September 15, 2014 12:29 AM2014-09-15T00:29:23+5:302014-09-15T00:29:23+5:30

वाशिम जिल्ह्यातील राजकीय बॅनर उतरली

The breakdown of code of conduct for political banners | राजकीय बॅनरबाजीला आचारसंहितेचा ब्रेक

राजकीय बॅनरबाजीला आचारसंहितेचा ब्रेक

googlenewsNext

वाशिम : विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत होताच जिल्हा प्रशासनाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. शहरांसह गावागावात लावण्यात आलेले राजकीय पक्षांचे व राजकारण्यांचे पोस्टर्स, बॅनर, इमारतींवरील जाहीराती झाकण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. विधानसभा आचारसंहितेच्या पार्श्‍वभूमिवर आता राजकारण्यांमध्ये सुरू झालेल्या बॅनरवॉरला लगाम बसणार आहे.
गत एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. तेव्हापासून राज्यात विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली होती. वाशिम जिल्हाही याला अपवाद नव्हता. विधानसभा निवडणूकीत विजयाच्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. तर विद्यमान आमदार अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक दृष्ट्रीपथात ठेऊनच विविध कामांच्या भूमिपुजनाचा सपाटा लावला होता. आचारसंहिता लाबल्यामुळे यांच्या दुधातच साखर पडली होती. परंतु १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागली आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या भूमिपुजनाच्या सपाट्याला लगाम लागला आहे. विद्यमान आमदारांचे काही प्रस्ताव प्रशासकीय मंजुरातीविना अडले असुन काही निधीही परत जाण्याची शक्यता आहे दुसरकडे विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी शक्तीपणास लावणार्‍या काही इच्छूकांनी मतदार संघात सर्वत्र बॅनर , पोस्टर्स लावून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी गणेशोत्सवाचे निमित्त साधून बॅनर लावले होते. आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही सर्व बॅनर उतरविण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक राजकीय पक्षाला आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना केल्या आहेत. या शिवाय प्रचारासाठी वापरण्यात येणारी वाहने, लाऊडस्पिकर तथा अन्य साधनांचीही रितसर परवानगी घ्यावी असे प्रशासनाने राजकीय पक्षांना सुचीत केले आहे.
          स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यासह वैधानिक विकास महांमडळ व इतर मंडळाच्या पदाधिकार्‍यांकडे असलेले शासकीय वाहने तात्काळ जमा करण्यात आली आहेत. त्यामुळे आता सदर पदाधिकार्‍यांची चांगलीच गोची झाली आहे.
आचारसंहितेच्या पृष्ठभूमिवर प्रशासनानेराजकीय पक्ष व राजकारण्यांना बॅनर काढण्याचे आदेश देऊनही कुणी या आदेशाचा भंग केल्यास त्याच्यावर प्रशासनाकडुन कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने खास पथक गठित केले असल्याची माहीती आहे.

Web Title: The breakdown of code of conduct for political banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.