लाचखोर लिपिक जेरबंद
By Admin | Published: June 1, 2017 08:05 PM2017-06-01T20:05:41+5:302017-06-01T20:22:31+5:30
रिसोड - ऐपतीचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच स्विकारताना रिसोड तहसील कार्यालयाच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयात गुरूवारी रंगेहात पकडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड - ऐपतीचा दाखला देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच स्विकारताना रिसोड तहसील कार्यालयाच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसील कार्यालयात गुरूवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास रंगेहात पकडले. दिलीप उत्तम पवार असे लिपिकाचे नाव आहे.
तालुक्यातील वाकद येथील एका तक्रारदाराला ऐपतीचा दाखला देण्यासाठी लिपिक दिलीप पवार याने तीन हजार रुपयाची लाच मागितली होती. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या अनुषंगाने गुरूवार, १ जून रोजी रिसोड तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. २.३० वाजताच्या सुमारास पवार याने लाचेची तीन हजार रुपये रक्कम स्विकारताच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.