नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:21+5:302021-08-02T04:15:21+5:30

वाशिम : नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरीचे प्रमाण घटले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाकाळातही शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाच ...

Bribery rampant even in denomination ban, communication ban! | नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरी जोरात!

Next

वाशिम : नोटाबंदी, संचारबंदीतही लाचखोरीचे प्रमाण घटले नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. कोरोनाकाळातही शासकीय काम करून देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाच घेतली. गत सहा वर्षांत लाचप्रकरणी ७९ सापळे यशस्वी झाले.

शासकीय नियमात बसणारे काम करून देण्यासाठी अनेक जण लाचेची मागणी करतात. काम लवकर व्हावे याकरिता काही जण लाच देतात तर शासकीय कामासाठी लाच कशाला? या विचाराने काही जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवितात. या तक्रारीनुसार सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई केली जाते. नोटाबंदी, संचारबंदी, कोरोनाकाळातही अनेकांनी लाच मागितली.

००००

महसूल, पोलीस विभाग सर्वात पुढे

लाच मागण्यात महसूल, पोलीस विभाग आघाडीवर असल्याचे दिसून येते. अधिकाऱ्यांपेक्षा कर्मचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.

महावितरण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, समाजकल्याण, लघु सिंचन आदी विभागातील काही कर्मचाऱ्यांनादेखील लाचप्रकरणी कारवाईला सामोरे जावे लागले.

शासकीय कामासाठी कुणी लाच मागितली तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.

०००००००००

लाच शंभरपासून एका लाखापर्यंत

प्रमाणपत्र देण्यासाठी १०० रुपयांची लाच

वाशिम नगर परिषदेंतर्गत तक्रारदास यास बांधकाम कामगार प्रमाणपत्र देण्याकरिता १०० रुपयांची लाच एका शिपायाने मागितल्याची घटना २०१९ मध्ये घडली होती.

.............

पाइपच्या देयकासाठी २.७४ लाखांची लाच

कृषी विभागास पुरवठा केलेल्या एचडीपीई पाइपच्या राहिलेल्या बिलांचे आरटीजीएस करून फिर्यादीच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी कृषी अधिकाऱ्याने फिर्यादीस २.७४ लाख रुपये लाचेची मागणी २०१७ मध्ये केली होती.

००००००००००००

कोट बॉक्स

कोणत्याही शासकीय, निमशासकीय कामासाठी कुणीही कुणालाही लाच मागू नये तसेच लाच देऊ नये, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे वारंवार करण्यात येते. कुणी लाचेची मागणी करीत असेल तर कोणतीही भीती न बाळगता तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येते तसेच भविष्यात तक्रारदाराला आरोपीकडून त्रास होणार नाही, याची दक्षतादेखील घेण्यात येते.

- शंकर शेळके

पोलीस उपाधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम

-

२०१६ १४

२०१७ १५

२०१८ १४

२०१९ २०

२०२० ११

२०२१ ०५

Web Title: Bribery rampant even in denomination ban, communication ban!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.