एका महिन्यात तीन वेळा वाहून गेला नदीवरील पूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 04:17 PM2020-07-10T16:17:13+5:302020-07-10T16:17:20+5:30
९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : आर्णि ते अकोला या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम मागील एक वषार्पेक्षा अधिक कालावधीपासून सुरू आहे. १६१ ए या क्रमांकाच्या या बांधकामामध्ये होत असलेल्या दिरंगाई आणि कंत्राटदार, कंपनीचा बेजबाबदारपणाचा फटका मानोरा तालुक्यातील असंख्य नागरिकांना वारंवार सहन करावा लागत आहे. बेलोरा गावानजिक नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यात येत आहे त्याकरिता रहदारीसाठी तात्पुरता पूल बांधण्यात आला. तो एका महिन्यात तीनवेळा वाहून गेला. यामुळे शेतकºयांची शेतीची कामे प्रभावित झाली असून वाहनधारकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
मानोरा दिग्रस कडे ये-जा करणाºया वाहनधारकांसाठी कंपनी प्रशासनाने थातूरमातूर आणि निकृष्ट अशा पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तो पहिल्याच पावसात वाहून गेला होता.
या कामावर फक्त ६ मजूर काम करत असतांना त्यातही आठवडयात केवळ दोन ते तीन दिवस काम चालु रहायचे. यावेळी ग्रामस्थांनी ठेकेदाराला सागितले की, मोठी आहे तुम्ही अगोदर हा पूल तयार करा परंतु लाँकडाऊन मुळे मजूर जास्त कामावर नसल्याचे सांगण्यात आले. ९ जुलै रोजी तिसºयांदा हा पूल वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. तसेच पुल वाहून गेला त्यामुळे आम्हाला शेतात जाण्या करीता रस्ता नाही ,त्यामुळे शेतीचे कामे रखड़ली असल्याचे मत बेलोरा येथील शेतकरी विलास ठाकरे यांनी व्यक्त केले.
शेतात पाणी साचल्याने नुकसान
पूल बांधकामा दरम्यान खोराडी नाल्याचे पाणी अडवल्यामुळे प्रल्हाद राठोड गव्हा आणि विष्णू जाधव माहूली ह्या दोन शेतकº्यांच्या जवळपास सात एकर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या शेतकºयांचा लाखो रुपयांचा नुकसानीलाही सदरील बांधकाम कंपनी प्रशासन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.तसेच तलाठी एस डी शेजुळ यांनी पुर परस्तिथी पाहणी केली असता त्याना हा पूल वाहून गेल्याचे दिसून आले .