वारा-देपूळ मार्गावरील पुल खचला!
By admin | Published: July 2, 2017 07:34 PM2017-07-02T19:34:12+5:302017-07-02T19:34:12+5:30
देपुळ (वाशिम ): जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथील कुंभार नाल्यावर खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच वारा ते देपुळ रस्त्यावरील सिमेंट क्रॉकीटचा पुल खचला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपुळ (वाशिम ): जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथील कुंभार नाल्यावर खोलीकरणाचे काम करण्यात आले. मात्र, अल्पावधीतच वारा ते देपुळ रस्त्यावरील सिमेंट क्रॉकीटचा पुल खचला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमधून वारा जहॉगीर येथे कुंभार नाल्यावर नाला खोलीकरणाचे काम तालुका कृषी विभागामार्फत करण्यात आले. थातुरमातुर काम केल्याने यामध्ये कुठे खोल तर कुठे उथळ तर कोठे खोलीकरणच केलेच नाही. यामध्ये वारा ते देपुळ रस्त्यावरील याच नाल्यावर पुलानजीक रस्त्याच्याकडेच्या नाल्या बुजविण्यात आल्या. त्यामुळे नाल्याने येणारे पाणी रस्त्यावर आले आणि पूल खचला. जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे हा पुल खचला असल्याने याची दुरुस्ती कृषी विभागाने तात्काळ करणे अपेक्षीत होते. मात्र, अद्यापही कृषी विभागाने याची दखल घेतली नाही. कृषी विभागाकडून दुरुस्ती करुन घेण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाची आहे. हे दोन्ही विभाग मूग गिळून बसले. परिणामी, शेतकऱ्यांसह नागरिकांची गैरसोय होत आहे.
जलयुक्तमध्ये ह्यवारा जहॉगीरह्णचा समावेश कसा ?
वार जहॉगीर येथे चार हजार एकर क्षमतेचा सिंचन प्रकल्प आहे. यामुळे परिसरातील गावातील जलपातळीत वाढ झाली. वारा हे गाव ह्यवॉटर न्युट्रलह्ण झालेले असतांना वारा गावाची निवड झाली कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गावाबाबत शासनाचे निकष गेले कुठे गेले हा प्रश्न आहे. परिसरातील काही गावांमध्ये या योजनेची गरज असतांना इलखी, हिस्से बोराळा सारखी गावे वगळण्यात आली.
सदर कामाची तथा उखडलेल्या पुलाची चौकशी कृषी पर्यवेक्षक मधुकर राऊत यांच्यामार्फत करणार असून चौकशीनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. दुरूस्ती करण्यायोग्य असेल तर दुरूस्ती केली जाईल.
- अभिजीत देवगिरकर, तालुका कृषी अधिकारी वाशिम
आम्ही सदर पुलाची पाहणी करुन याबाबत चौकशी करणार आहोत. जलयुक्त शिवार योजनेचे काम करणाऱ्या यंत्रणेच्या चुकीने हे नुकसान झाले असेल तर निश्चितच त्यांच्याकडून ही दुरुस्ती करुन घेतल्या जाईल.
- व्ही.डी.धुमाळे, शाखा अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग वाशिम