वाशिम जिल्ह्यातील पुलांची अवस्था वाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:51 PM2017-11-20T13:51:00+5:302017-11-20T13:51:57+5:30
वाशिम: जिल्ह्यात विविध राज्यमार्ग, जिल्हा मार्गासह इतर महत्त्वाच्या मार्गावरील काही पुलांची अवस्था वाईट झाली आहे.
वाशिम: जिल्ह्यात विविध राज्यमार्ग, जिल्हा मार्गासह इतर महत्त्वाच्या मार्गावरील काही पुलांची अवस्था वाईट झाली आहे. कठडे ढासळण्याच्या प्रकारासह पुलांच्या गाळ्यातील भिंतीही जीर्ण होत असताना या पुलांची किमान किरकोळ दुरुस्ती करण्यासह काही पुलांची उंची वाढविणे आवश्यक असताना त्याची दखल घेण्यात येत असल्याचे दिसत नाही.
जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्ग आणि इतर महत्त्वाच्या मार्गावर मिळून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारित येणाºया पुलांची संख्या २१५ आहे. यातील निम्म्याहून अधिक पुलांची उभारणी किमान २५ वर्षांपूर्वी झाली आहे. भुगोलीय परिवर्तन आणि नदी, नाले खचल्याने अरूंद झाले असताना पाण्याच्या प्रवाहामुळे पुलांची अवस्थाही वाईट झाली आहे. अनेक ठिकाणी, तर नाल्याच्या उंचीपेक्षा पूल खोलगट भागात असल्याचेही पाहायला मिळत आहे. पावसाच्या दिवसांत अशा पुलांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होतो, तसेच अचानक वाढणाºया पुराच्या लोंढ्यामुळे अपघाताचीही भिती असते. या पृष्ठभूमीवर पुलांची दुरुस्ती करून उंची वाढविण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्ह्यातील पुलांचे निरीक्षण केले; परंतु त्यांच्या अहवालानुसार ५ पुलांची किरकोळ दुरुस्ती, तर केवळ एका पुलाची विशेष दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी अनेक पुलांवर वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागतो. पुलांची अवस्था वाईट झाली असताना रुंदीही कमी असल्याने या पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असून, संभाव्य अपघाताची शक्यता लक्षात घेता. बांधकाम विभागाने या संदर्भात वरिष्ठस्तरावर निरीक्षण अवाहल पाठवून पुलांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.