पूल वाहून गेला; नाल्याच्या पाण्यातून शेतमालाची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 05:39 PM2020-10-04T17:39:34+5:302020-10-04T17:39:42+5:30
The bridge was swept away पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला.
लोकमत न्युज नेटवर्क
इंझोरी (वाशिम): मानोरा तालुक्यातील इंझोरी परिसरातील इंझोरी-पिंपळगाव या पाणंद रस्त्यावरील पूल गेल्या अडीच वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे वाहून गेला. त्यामुळे ३०पेक्षा शेतकºयांची वहिवाटच अडचणीत आली असून, सोयाबीनसह इतर शेतमालाची काढणी केल्यानंतर नाल्यातील खाच खळग्यातून सायकलने किंवा डोक्यावर साहित्याची ने-आण करावी लागत आहे. तथापि, या पुलाची जबाबदारी असलेला पुनवर्सन विभागाने अद्याप (४ आॅक्टोबर) त्याची दखल घेऊन पुलाची दुरुस्ती केली नाही.
मानोरा तालुक्यातील म्हसणी नजिक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर या प्रकल्पाकडे जाणाºया इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकºयांची वहिवाट बंद झाली. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकºयांची पंचाईत झाली. वारंवार या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर या पाणंद रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पुलाची उभारणी केली. साधारण अडीचवर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे शेतकºयांची वहिवाट बंद झाली. आता येथून कुठलीच वाहने नेता येत नाहीत, तर शेतात पायी जाण्यासाठीही शेतकरी, शेतमजूर महिलांना नाल्यात उतरून पाण्यात चालत जावे लागते. शिवाय इतर रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने शेतकºयांना शेतात जावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता शेतमाल काढणीनंतर शेतकºयांना शेतमाल घरी आणने कठीण झाले असून, नाल्याच्या पाण्यातून शेतकरी सायकलने शेतमालाची वाहतूक करीत असल्याचे गंभीर चित्र येथे पाहायला मिळत आहे.