पावसामुळे पूल उखडला; वाहतूक प्रभावित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:14+5:302021-06-21T04:26:14+5:30

गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ...

The bridge was torn down by rain; Traffic affected! | पावसामुळे पूल उखडला; वाहतूक प्रभावित !

पावसामुळे पूल उखडला; वाहतूक प्रभावित !

Next

गत आठवड्यापासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. ११ ते १६ जूनदरम्यान चिखली-कवठा परिसरात संततधार पाऊस झाला. यामुळे कवठा ते रिसोड यादरम्यान असलेल्या पुलाची एक बाजू पूर्णत: उखडली असल्याने चारचाकी वाहनांची वाहतूक प्रभावित झाली आहे. या ठिकाणावरून पायी व दुचाकी वाहनाने ये-जा सुरू आहे; मात्र चारचाकी वाहन जात नसल्याने गैरसोय होत आहे. रिसोड तालुक्यातील निर्माणाधिन पुलांची रखडलेली कामे व अस्तित्वात असलेल्या छोट्या स्वरूपातील जमीन समांतर पुलांमुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टर शेतजमीन खरडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. धोकादायक अवस्थेतील या पुलांप्रमाणेच कवठा जिल्हा परिषद गटातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्ते व पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी स्वप्नील सरनाईक यांनी केली.

.........

कोट बॉक्स

कवठा-रिसोड यादरम्यानच्या पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना रिसोड येथील अभियंत्यांना दिल्या आहेत. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करून वाहनधारकांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न आहे.

- सुनील कळमकर

कार्यकारी अभियंता,

सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम

Web Title: The bridge was torn down by rain; Traffic affected!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.