उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:21+5:302021-08-13T04:47:21+5:30
केंद्र सरकारने २०१६ मध्ये पहिल्यांदा उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील देशातील ५ कोटी महिलांना ...
केंद्र सरकारने २०१६ मध्ये पहिल्यांदा उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती. दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या कुटुंबातील देशातील ५ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य केंद्र सरकारकडून ठेवण्यात आले होते. एप्रिल २०१८ मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला. त्यावेळी यामध्ये सात श्रेणीतील महिलांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी निर्धारित लक्ष्य ८ कोटीपर्यंत वाढविण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ३२ हजार कुटुंबांना या योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन मिळाले आहे.
१) दोन कॉलम फोटो (12६ँ09)
२) जिल्ह्यात आतापर्यंत मिळालेले उज्ज्वला कनेक्शन - २१,८७०
३) गॅस सिलिंडरचे दर
जानेवारी २०१९ -६१०.००
जानेवारी २०२० - ६१३.००
जानेवारी २०२१ - ७१४.५०
आॅगस्ट २०२१ - ८५५ .००
३) सिलिंडर भरणे कसे परवडणार?
१) कोट: सिलिंडर आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सतत वाढ होत आहे. ही बाब गृहिणींसाठी चिंतेचा विषय आहे. सरकार मोफत कनेक्शन देत असले तरी सिलिंडर भरून आणावे कसे, असा प्रश्न आहे.
-वैशाली गायकवाड,
गृहिणी
---
कोट: गेल्या वर्षभरापासून सिलिंडरच्या दरात सतत वाढ होत आहे. अवघ्या १२ महिन्यांतच सिलिंडरचे दर २४० रुपयांनी वाढले. आता सिलिंडर भरून आणण्यापेक्षा चुलीवरचा स्वयंपाक परवडत आहे.
- रेखाबाई खैरे, गृहिणी
----------
कोट: कोरोनामुळे आधीच रोजगार मिळणे कठीण झाले. उत्पन्न घटले, तर दुसरीकडे सिलिंडरचे दर वाढत आहेत. त्यामुळे कनेक्शन मोफत मिळत असले तर ते भरून आणावे कसे, असा प्रश्न पडतो. त्यामुळे चुलीवरच स्वयंपाक सुरू आहे.
- बेबीबाई हळदे,
गृहिणी