वाहन चालविताना नियम तोडला; दंड कधी भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:27 AM2021-07-08T04:27:16+5:302021-07-08T04:27:16+5:30

वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरवाहतूक शाखेच्यावतीने ३४१८२ वाहन चालकांना दंड करण्यात आला. यापेैकी केवळ १५३७ वाहनचालकांनी ...

Broke the rules while driving; When will the fine be paid? | वाहन चालविताना नियम तोडला; दंड कधी भरणार?

वाहन चालविताना नियम तोडला; दंड कधी भरणार?

Next

वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरवाहतूक शाखेच्यावतीने ३४१८२ वाहन चालकांना दंड करण्यात आला. यापेैकी केवळ १५३७ वाहनचालकांनी दंड भरला असून अद्याप ३२१२४ वाहनचालकांनी दंडच भरला नसल्याचे शहर वाहतूक शाखेकडे नाेंद असलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

काेराेना काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची धडक मोहीम पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी हाती घेतली हाेती. त्यानुसार ८७ लाख ९७ हजार २०० रुपयांचा दंड नियमांच्या उल्लंघनप्रकरणी वाहनचालकांना करण्यात आला हाेता. यापैकी केवळ वाहनचालकांनी १५ लाखच दंड भरला आहे. शहर वाहतूक शाखेच्यावतीने दंड न भरलेल्यांना नाेटीस बजावण्यात आल्या आहेत.

......................

२०२१ मधील आकडेवारी काय सांगतेय

३४१८२ जणांनी तोडला नियम

१५३७ व्यक्तींनी भरला दंड

३२१२४ व्यक्तींनी दंड भरलाच नाही

८७९७२०० एकूण दंडाची रक्कम

१५१०००० भरलेला दंड

७२८७२०० थकबाकी दंडाची रक्कम

................

वेगावर हवे नियंत्रण; सर्वाधिक दंड विना परवाना

वाशिम शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आलेल्या दंडामध्ये सर्वाधिक दंड हा विना परवाना वाहन चालविणाऱ्यांना करण्यात आला आहे. १२६३२ जणांना याप्रकरणी दंड करण्यात आला.

फॅन्सी नंबर प्लेट लावणे याप्रकरणी द्वितीय क्रमांकावर दंड आकारण्यात आला. ७३८२ जणांना चालू वर्षात दंड करण्यात आला आहे. तसेच आरटीओ नियमानुसार वाहनाची नंबर प्लेट ताबडताेब तयार करण्याच्या सूचना दंड झालेल्या व्यक्तींना देण्यात आल्या आहेत.

कुठेही वाहने उभे करून जाणे, नाे पार्कींगमध्ये वाहने उभी करणे अशा वाहनचालकांवर चालू वर्षात ६७३१ वाहनचालकांना दंड आकारण्यात आला आहे.

................

लवकर दंड न भरल्यास...

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना ई चलान दंड केल्यानंतर त्यांनी दंड न भरल्यास त्यांना नाेटीस पाठवून दंड भरण्याचे सांगण्यात येते. त्यानंतरही दंड न भरल्यास गाडी जप्त करण्याची कारवाई करण्यात येत असल्याची माहिती वाशिम शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक नागेश माेहाेड यांनी दिली.

दंड झाल्यानंतरही दंड न भरलेल्यांकडून काेराेना काळात ३ लाख रुपये दंड शहर वाहतूक शाखेतर्फे वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Broke the rules while driving; When will the fine be paid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.