वाशिममधील बीएसएनलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा देशव्यापी संपात सहभाग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 07:19 PM2017-12-12T19:19:46+5:302017-12-12T19:22:27+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

BSNL officers in Washim, employees participate in nationwide strike! | वाशिममधील बीएसएनलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा देशव्यापी संपात सहभाग!

वाशिममधील बीएसएनलच्या अधिकारी, कर्मचार्‍यांचा देशव्यापी संपात सहभाग!

Next
ठळक मुद्देसेवा प्रभावितकर्मचारीविरोधी धोरणांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारत संचार निगम लिमिटेड व इतर संघटनांच्या सहभागातून १२ व १३ डिसेंबर असे दोन दिवस पुकारलेल्या देशव्यापी लाक्षणिक संपामध्ये अधिकारी व कर्मचा-यांनी सहभाग घेतला. बीएसएनएल कर्मचारी व अधिका-यांना तिसरा वेतन करार त्वरीत लागू करा, टॉवर उपकंपनी स्थापन करण्याचा निर्णय रद्द करा, या व इतर मागण्यांसाठी हा दोन दिवशीय संप पुकारण्यात आला आहे. 
स्थानिक बीएसएनएलच्या कार्यालयासमोर १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सुरू करण्यात आलेल्या या लाक्षणिक संपामध्ये बीएसएनएलचे एसडीई जगनाडे, जेटीओ ठाकरे, एन.पी. तायडे, व्ही.व्ही. काळे, एस.डी. कांबळे, पी.वाय. सिरसाट, आर.एन. अहिरकर, आर.एम. दिवनाले, बी.एस. राठोड, पी.एच. जीतकर, ए.एस. गाभणे, पी.एन. दामोदर, व्ही.बी. मोहोड, संतोष जानोरकर, डाखोरे, एस.व्ही. ठाकुर, एस.एम. व्यवहारे, जे.पी. पवार आदी अधिकारी व कर्मचारी या संपात सामील झाले आहेत. या संपामुळे बीएसएनएलची सेवा प्रभावित झाली असून विभागातील कामे ठप्प पडली आहेत.

Web Title: BSNL officers in Washim, employees participate in nationwide strike!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.