जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 02:38 PM2019-08-09T14:38:50+5:302019-08-09T14:38:55+5:30

शिरपूरसह चार गावांमधील बीएसएनएल कार्यालयाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळित करण्यात आला नाही.

BSNL's power supply not restore even after orders from collectors! | जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडितच!

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बीएसएनएलचा वीज पुरवठा खंडितच!

Next

- सुनील काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून कधीही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. त्यामुळे महावितरणने बीएसएनएलच्या कुठल्याही कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केला असल्यास तो तत्काळ जोडावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी ७ आॅगस्ट रोजीच दिले; परंतु त्यानंतरही शिरपूरसह चार गावांमधील बीएसएनएल कार्यालयाचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळित करण्यात आला नाही. यामुळे बुधवारप्रमाणेच गुरूवारीही ब्रॉडबॅण्ड सेवा ठप्प राहिल्याने बँकांसह अन्य कार्यालयांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून आले.
वीज देयक थकीत असल्याने महावितरणने बुधवारी अनसिंग, शिरपूर, केकतउमरा आणि जऊळका येथील बीएसएनएलच्या कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित केला. यामुळे ब्रॉडबॅण्ड सेवा ठप्प झाल्याने नमूद सर्व गावांमध्ये बँकांची कामे पूर्णत: विस्कळित झाली. शिरपूर येथेही बँकींग व्यवहारांना फटका बसण्यासह मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करणाºया कार्यालयातील व्यवहार पूर्णत: बंद झाले. पोलिस स्टेशनमधील आॅनलाईन तक्रार पोर्टलही इंटरनेटअभावी ठप्प झाले. दरम्यान, ही कारवाई सद्य:स्थितीत योग्य नसून बीएसएनएलच्या कुठल्याच कार्यालयाचा विद्यूत पुरवठा खंडित करू नये. केला असल्यास तो तत्काळ पुर्ववत करावा आणि केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल १० आॅगस्टपुर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले; मात्र ८ आॅगस्टपर्यंत त्याचे पालन झालेले नव्हते. यामुळे शिरपूर व अन्य गावांतील बँकींग व्यवहारांसह इंटरनेटची गरज भासणाºया कार्यालयांचे कामकाज खोळंबल्याचे दिसून आले.


‘बीएसएनएल’कडे ५० लाखांवर थकबाकी
शिरपूर येथील बीएसएनएलच्या कार्यालयासह वाशिम जिल्ह्यातील अन्य बीएसएनएल कार्यालयांकडे असलेली वीज देयकांची थकबाकी ५० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. ही रक्कम वसूल होणे अशक्य ठरत असल्यानेच महावितरणकडून बीएसएनएलचा विद्यूत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


नैसर्गिक आपत्तीच्या वेळी इंटरनेट सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक असल्याच्या सूचना देवून जिल्ह्यातील बीएसएनएलच्या कुठल्याही कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करू नये. केला असल्यास तो पुर्ववत करावा, अशा जिल्हाधिकाºयांच्या आदेशावरून महावितरणने अनसिंगच्या कार्यालयाचा वीज पुरवठा सुरळित केला आहे. लवकरच अन्य गावांमधील बीएसएनएलचा वीज पुरवठाही सुरू केला जाईल.
- आर.जी.तायडे, कार्यकारी अभियंता, महावितरण

Web Title: BSNL's power supply not restore even after orders from collectors!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.