शिरपुरच्या ब्रिटीशकालीन प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत इतिहास जमा

By admin | Published: April 1, 2017 04:33 PM2017-04-01T16:33:11+5:302017-04-01T16:33:11+5:30

शिरपूर जैन: ब्रिटीशांच्या काळात बांधणी केलेली आणि गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंंद्र म्हणून वापरण्यात आलेली शिरपूर जैन येथील इमारत आता इतिहास जमा झाली आहे.

Building History of the British-based Primary Health Center in Shirpur | शिरपुरच्या ब्रिटीशकालीन प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत इतिहास जमा

शिरपुरच्या ब्रिटीशकालीन प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत इतिहास जमा

Next

शिरपूर जैन: ब्रिटीशांच्या काळात बांधणी केलेली आणि गोरगरीब रुग्णांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंंद्र म्हणून वापरण्यात आलेली शिरपूर जैन येथील इमारत आता इतिहास जमा झाली आहे. अतिशय शिकस्त झालेली ही इमारत धोकादायक ठरत असल्यामुळे ती पाडण्यात आली असून, आता  या जागेवर लवकरच अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त अशी इमारत उभारण्यात येणार आहे. 
ब्रिटीश काळामध्ये बांधण्यात आलेली शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत अतिशय मोडकळीस आली होती. ठिकठिकाणी भिंतीला तडे गेले होते. विज पुुरवठ्याच्या तारा  ठिकठिकाणी तुटल्या होत्या. या इमारतीत महिलांसाठी प्रसाधनगृह नव्हते परिणामी त्यांची कुंचबना होत होती. कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रि या केलेल्या महिलांना गावाबाहेर किलोमीटर अंतरावर शौचास जावे लागत होते. या समस्या ध्यानात घेता काही वर्षांपूर्वी तत्कालीन स्थानिक लोकप्रतिनिधींनी नवीन इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला व शासनाकडून तीन कोटी रुपये इमारतीसाठी मंजूर झाले; परंतु मागील पाच वर्षांपासून निधी तसाच पडून होता. जि.प.सदस्या शबानाबी मो.ईमदाद यांनी जि.प.च्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रश्न लावून धरला व बांधकाम सुरू करण्यास भाग पाडले. 

Web Title: Building History of the British-based Primary Health Center in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.