मालेगाव येथील पंचायत समिती इमारतीच्या लोकार्पणाला मुर्हूत मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 06:26 PM2018-01-05T18:26:27+5:302018-01-05T18:29:28+5:30
मालेगाव: येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय ईमारतीचे काम पूर्ण होऊन या ईमारतीचे हस्तांतरण रितसरपणे जिल्हा परिषदेकडे करण्यात आले आहे; परंतु या प्रक्रियेला सहा महिने उलटले तरी, या ईमारतीच्या लोकार्पणाचा सोपस्कार मात्र अद्यापही झालेला नाही. दुसरीकडे लोकार्पणापूर्वीच या ईमारतीत काही प्रशासकीय कामांना सुरुवातही करण्यात आली आहे.
मालेगावच्या पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा ताबा वाशिम जिल्हा परिषदेकडे आल्यानंतर अनेक महिने लोकार्पणाची कोणाची वाट पाहिली. अखेर महिनाभरापूर्वी मालेगाव पंचायत समितीच्या प्रशासनाने या इमारतीत काही प्रमाणात कामकाजाला सुरुवात केली आहे. रोजगार हमी योजना, आरोग्य विभाग कक्षासह इतर काही कक्षाचे काम या ईमारतीत सुरू आहे. विशेष म्हणजे एकिकडे काही महिन्यांवर येऊन ठेपलेला ‘मार्च एंडिंग’ आणि दोन आठवड्यात दाखल होेत असलेली पंचायतराज समिती याचा धसका घेत कर्मचाºयांच्या सभा वर सभा घेण्याचा सपाटा या नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू झाला आहे. उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो), मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्या सभांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे मालेगाव पंचायत समितीची ही नवी प्रशासकीय इमारत लोकार्पण पूर्वीच कार्यरत झाल्याचे स्पष्ट होत आहे. असे असताना केवळ लोकार्पणाचा सोपस्कार पार पाडण्यासाठी ईमारतीच्या मुुख्य प्रवेश घरांना कुलूप बंद ठेवण्यात आलेले आहे दुसरीकडे बहुतांश पदाधिकारी मात्र आपल्या नेत्यांच्या हाताने लोकार्पण करण्याकरिता जिद्द धरून बसलेले आहेत सभापती आणि उपसभापती कक्ष जुन्या इमारतीमध्ये कायम सुरू आहेत प्रशासनाचा काही कारभार जुन्या इमारतीमध्ये तर काही कारभार नव्या इमारतीमध्ये सुरू असल्याने जनतेची या इमारतीतून त्या इमारतीमध्ये येरझारा घालताना दमछाक होत आह