वाशिम जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या इमारतीची कळा बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 01:09 PM2019-02-12T13:09:21+5:302019-02-12T13:09:28+5:30
वाशिम: जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४५.३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी ४५.३० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. यामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांसह कर्मचाºयांच्या निवासस्थानांची कळा बदलणार आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम १८२ अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांतर्गत कार्यालयीन व निवासी इमारतींच्या दुरुस्तीसाठी १९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यास १२ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार मंजुरी मिळाली आहे. शासन निर्णयानुसार १९६१ च्या आणि पीआरबीमध्ये नोंद असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रशासकीय व निवासी इमारतींच्या देखभाल दुरुस्ती या निधीतून केली जाणार आहे. यात वाशिम जिल्ह्यातील इमारतींसाठी ४५.३० लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. यापुर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे मंजुरीबाबत जी कार्यपद्धती अवलंबिण्यात येत होती, तीच कार्यपध्दती अवलंबून कामे मंजूर करावी लागणार आहेत. इमारती देखभाल दुरुस्ती संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने विहित केलेले नियम व मार्गदर्शक सुचनांचे पालनही पंचायत समित्यांच्या दुरुस्तीची कामे या निधीतून करावी लागणार आहेत, तसेच, दुरुस्ती पुर्वीचे व नंतरचे फोटो जतन करुन ठेवावे लागणार आहेत. या निधीतून कामे करताना मंजूर कामाचे तुकडे न पाडता आवश्यकतेनुसार इ-निविदा कार्यपध्दतीचा अवलंब करुन कामाचे आदेश संबंधित विभागाला द्यावे लागणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील पंचायत समित्यांची प्रशासकीय कार्यालये आणि पंचायत समित्यांतर्गत येणाºया कर्मचाºयांच्या नादुरुस्त निवासस्थानांची अवकळा दूर होणार आहे.