बुलडाण्यातील मजूर पोटापाण्यासाठी वाशिम जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 03:25 PM2018-12-02T15:25:03+5:302018-12-02T15:25:48+5:30
वाशिम: यंदा पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६९.६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा पश्चिम वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ६९.६९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, रोजगाराचा प्रश्नही गंभीर झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील मजूर पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यात मुलाबाळांसह भटकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ६६७.८ मि.मी. असताना यंदा या जिल्ह्यात केवळ ४६५.४ मि.मी. पावसाची नोंद २९ सप्टेंबरपर्यंत अर्थात पावसाळ्याच्या अखेरीस करण्यात आली. त्यातच या जिल्ह्यातील देऊळगाव राजा, खामगांव, शेगाव आणि नांदुरा या चार तालुक्यांची स्थिती अधिकच गंभीर आहे. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या झळांनी होरपळत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईसह रोजगाराच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. त्यामुळेच या जिल्ह्यातील मजूर वर्ग बिºहाड घेऊन मुलाबाळांसह इतर जिल्ह्यात रोजगारासाठी भटकत आहेत. याच जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्याने अनेक मजूर वाशिम जिल्ह्यात रोजगारासाठी मुलाबाळासह या गावातून दुसºया गावात फिरत आहेत. बैलगाड्यांमध्ये बिºहाड टाकून मुलाबाळांना सोबत घेऊन महिला वर्ग बैलगाडी हाकत असल्याचे चित्र पाहून बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळाची प्रचिती येत आहे. रविवारी मोताळा तालुक्यातील १० ते १२ कुटूंब बैलगाडीने वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात दाखल झाल्याचे दिसले