शिरपूर येथे घरफोडी; ३० हजाराचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 16:24 IST2019-04-16T16:24:03+5:302019-04-16T16:24:12+5:30
घराचा कडीकोंडा उघडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजाराच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना १५ एप्रिलच्या रात्रीदरम्यान घडली.

शिरपूर येथे घरफोडी; ३० हजाराचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम) - शिरपूर येथील आई भवानी मंदिराजवळच्या वस्तीतील दीपक मधूकर जाधव यांच्या घराचा कडीकोंडा उघडून अज्ञात चोरट्यांनी तीस हजाराच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना १५ एप्रिलच्या रात्रीदरम्यान घडली.
शिरपूर येथील दीपक जाधव यांच्या घराचा दरवाजाच्या अज्ञात चोरट्यांनी १५ एप्रिलच्या रात्री बाहेरुनच दरवाजाचा आतील बाजुचा कडीकोंडा उघडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाट उघडून त्यातील ८ ग्राम सोन्याची पोत व ६ हजार रुपये नगदी असा ३० हजाराचा ऐवज चोरून पोबारा केला. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवी कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी श्वानपथकाला तसेच ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा माग काढण्यात श्वान पथकाला यश आले नाही.