मंगरुळपीर येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

By admin | Published: July 11, 2017 07:32 PM2017-07-11T19:32:12+5:302017-07-11T19:32:12+5:30

मंगरुळपीर : दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणी प्रोत्साहन देणाऱ्या पाकीस्तानचे राष्टाध्यक्ष नवाज शरीफ याच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला.

The burning of the statue of Nawaz Sharif at Mangarul Peir | मंगरुळपीर येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

मंगरुळपीर येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर - येथील अकोला चौकात ११ जुलै सकाळी ११ वाजता शिवराज मिञ मंडळ आणी भाजपाचेवतीने दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणी प्रोत्साहन देणाऱ्या पाकीस्तानचे राष्टाध्यक्ष नवाज शरीफ याच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शहिद जवानांना आणी अमरनाथ याञेत मृत्युमुखी पडलेल्या भावीकांना श्रध्दांजली वाहन्यात आली.
१० जुलै रोजी राञी अमरनाथ याञेकरुंवर आणी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला.या हल्ल्यामध्ये भारतीय सैनिक शहीद होवुन आणी याञेकरु मूत्युमुखी पडले.या भ्याड हल्लेखोरांना पाकीस्तान सारखा देश हल्लेखोरांना प्रोत्साहन देत असुन अशा भ्याड हल्लेखोर दहशतवाद्यांना आसराही देतो आणी यामध्ये चिन या देशाचे सहकार्यही आहे त्यामुळे या निषेधार्थ मंगरुळपीर तालुक्यातील शिवराज मिञमंडळ आणी भाजपा पक्षाकडून ११ जुलै रोजी येथील अकोला चौकात जाहीर निषेध करुन नवाज शरीफ यांच्या पुतळ्याला जोडे मारुन दहन करन्यात आले. यावेळी शिवराज मिञमंडळाचे अध्यक्ष आणी भाजपा नगरसेवक अनिल गावंडे,नगरसेवक पुरुषोत्तम चितलांगे,श्याम खोडे,सचिन पवार,विशाल लवटे,सुनिल मालपाणी,गणेश लुंगे,अनिल भडांगे,गणेश गावंडे,मनोज मुळे,दिनेश तेलंग,अरुण पाटील थेर,मंगेश म्हातारमारे,विवेक मानवतकर,नंदु चांभारे,गजानन धनवे,गजानन माने,घनश्याम खिराडे,सतिष हिवरकर,प्रशांत गावंडे,जय चव्हाण,युवराज राठोड,नंदु जाधव,महादेव सोळंके,लखन गावंडे,,वैभव गावंडे,रवी ठाकुर,विनोद कोळकर,चंदु राऊत,रामदास ठाकरे,संजय गुप्ता आदी कार्यकर्त्यांची ऊपस्थीती होती.

Web Title: The burning of the statue of Nawaz Sharif at Mangarul Peir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.