बसस्थानकातील विक्रेत्यांच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:57+5:302021-08-25T04:45:57+5:30
०००००००००००००००००००००००००० ग्रामीण भागातील बसेसची प्रतीक्षा कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. रोज एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. लांब पल्ल्याच्या ...
००००००००००००००००००००००००००
ग्रामीण भागातील बसेसची प्रतीक्षा
कोरोना महामारी पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही. रोज एक-दोन रुग्ण आढळून येत आहेत. लांब पल्ल्याच्या बसेस केवळ सुरू आहेत. ग्रामीण भागातील प्रवासी म्हणावे तेवढे शहराच्या ठिकाणी येत नाहीत. सणावाराच्या दिवशी ग्रामीण भागातील प्रवासी येतात. ग्रामीण बसेस कधी सुरू होतात याची प्रतीक्षा प्रवासी करीत आहेत.
- मोहम्मद रफिक, विक्रेता
००००००००००००
खरमुरे, फुटाणे विकून पोट भरतो...
मंगरूळपीर बसस्थानकातील आम्ही तीन विक्रेते आजमितीस खरमुरे, चिप्स, गोळ्या, फुटाणे, बिस्किटे व इतर साहित्याची विक्री करून संसाराचा गाडा चालविताे. दिवसाकाठी १०० रुपये पदरात पडतात. संसाराचा गाडा चालविण्यासाठी सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.
- शेख मोबीन, विक्रेता
०००००००००००००००००००००००००००
ग्रामीण प्रवाशांअभावी अडचणी
कोरोना महामारी अजून पूर्णपणे संपलेली नाही; त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागांतील प्रवासी बसस्थानकावर येतच नाहीत. केवळ मुख्य मार्गावर असलेल्या गावांतील प्रवासीच बसस्थानकावर येतात. ग्रामीण प्रवासी नसल्याने व्यवसाय थंडाच आहे.
-शेख रहिम, विक्रेता.
००००००००००००००००००००००- मंगरुळपीर बसस्थानकातून रोज सुटणाऱ्या बसेस - २६७
-----------
स्थानकातील विक्रेते - ०३
००००००००००००००००००००००००००००
एस.टी. महामंडळाला द्यावे लागते शुल्क
- बसस्थानकावर खारमुरे, चिप्स, गोळ्या, फुटाणे, बिस्कीट व इतर साहित्याची विक्री करण्यासाठी व्यावसायिकाला महिन्याकाठी ९४१ रुपये शुल्क भरावे लागते.
- बसस्थानकावर खारमुरे, चिप्स, गोळ्या, फुटाणे, बिस्कीट व इतर साहित्यांची विक्री करण्यासाठी व्यावसायिकाला बॉण्ड लिहून द्यावा लागतो. पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्रही द्यावे लागते.