निम्म्या ग्रामीण बसगाड्यांसह मुक्कामी जाणाऱ्या बसही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:39+5:302021-09-02T05:29:39+5:30

००००००००००००००००००० या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत : १) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल मंगरूळपीर आगारांतर्गत ग्रामीण भागांतील दिवसा ...

Buses plying with half rural buses are also closed | निम्म्या ग्रामीण बसगाड्यांसह मुक्कामी जाणाऱ्या बसही बंद

निम्म्या ग्रामीण बसगाड्यांसह मुक्कामी जाणाऱ्या बसही बंद

Next

०००००००००००००००००००

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत :

१) शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल्ल

मंगरूळपीर आगारांतर्गत ग्रामीण भागांतील दिवसा धावणाऱ्या बस बंद असताना शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्या मात्र जाेरात सुरू आहेत. या बसगाड्यांत अनेकदा क्षमतेपेक्षा ५ ते ६ प्रवासी अधिकच असतात. प्रवाशांना बसायला जागाही मिळत नाही. कारंजा, वाशिम, अकोला, मानोरा या चारही प्रमुख मार्गांवर शहरी भागात जाणाऱ्या बसगाड्या हाऊसफुल्ल असतात.

००००००००००००००००

२) ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना

शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्या फुल्ल असताना ग्रामीण भागांतील तीन बसगाड्या मात्र बंदच असून, रामगाव, वटफळ, अनसिंग या मार्गांवरील तीन बसफेऱ्याच सुरू आहेत. ग्रामीण बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने या बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी चढतात. त्यामुळे अनेकांना बसायला जागाही मिळत आहे. शहरी भागांत जाणाऱ्या बसगाड्यातही ग्रामीण प्रवासी असतात.

०००००००००००००००

३) मुक्कामी जाणाऱ्या तीन गाड्यांचे काय?

जिल्ह्यातील चारीही आगारांत मुक्कामी जाणाऱ्या बसगाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मंगरूळपीर आगारात ग्रामीण भागांत मुक्कामी जाणाऱ्या बस बंद असल्या तरी या गावांत सकाळी, सायंकाळी नियमित फेरी सोडली जात आहे; परंतु काही गावांत मात्र ही सुविधाही नसल्याने संबंधित गावांतील अनेक प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

००००००००००००००००

४) मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास (दोन प्रवाशांच्या प्रतिक्रिया)

कोट

पूर्वी मंगरूळपीर आगाराची बोरव्हा ही मुक्कामी बस रात्री आठ वाजता गावात पोहोचायची. त्यामुळे शहरात काम आटोपून याच बसने गावी यायला, तर सकाळी शहरात जायला आधार होता. आता ही बस बंद असल्याने खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.

- नारायण ठाकरे,

व्यावसायिक, बोरव्हा

००००००००००००००००००००००००

कोट

मंगरूळपीर आगाराची बोरव्हा येथे मुक्कामी जाणारी बस आम्हाला सकाळच्या प्रवासासाठी सोयीची होती. सकाळी शहरात कामावर वेळेत पोहोचणे या बसमुळे शक्य होत असे. आता ती बंद असल्याने ऑटोरिक्षाची प्रतीक्षा करावी लागते.

- मारुती देवरे,

प्रवासी, कोठारी

आगारप्रमुखांचा कोट

कोट

मंगरूळपीर आगारात उपलब्ध बसगाड्यांतून फेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. गाड्यांची संख्या कमी असतानाच ग्रामीण भागात अपेक्षित प्रमाणात प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने काही फेऱ्या सोडणे शक्य नाही. तथापि, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी काही गावांत पर्याय म्हणून बसफेऱ्या सोडल्या जात आहेत.

-ए. के. मिर्झा,

आगार व्यवस्थापक, मंगरूळपीर

Web Title: Buses plying with half rural buses are also closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.