विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शन मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:58 PM2019-01-16T13:58:41+5:302019-01-16T13:59:04+5:30
मानोरा : स्थानिक मातोश्री सुभद्राबाई पाटील कला, विज्ञान व कै.पांडूरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समिती तसेच महाराष्ट्र राज्य तंंत्र शिक्षण यांंच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क

व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याकरिता फॉर्मसी कॉलेज अॅन्ड रिसर्च सेंटर खेर्डा येथील प्राचार्य नितीन कोहळे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणुन विद्यार्थ्यांना व्यवसाय मार्गदर्शनासंबंधी माहिती दिली. शासकीय तंत्र निकेतन वाशिम येथील प्रा.जरुडकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंत्र निकेतन मधील प्रवेश प्रक्रियेबाबत तर प्रा.खिल्लारे यांनी विविध कोर्ससची माहिती दिली. तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे अध्यक्ष रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीचे संयोजक प्रा.डॉ.नरेंद्र ठाकरे होते . तंत्र शिक्षण मार्गदर्शन मेळावा यशस्वी करण्यासाठी रोजगार उद्योग प्रशिक्षण व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समितीचे सदस्य प्रा.व्ही.डी.ठाकरे, प्रा.एस.ए.काळे, प्रा.व्ही.आर.डवले, प्रा. भलावी, यांनी सहकार्य केले.