बाजारपेठेतील व्यवसाय सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:47 AM2021-08-13T04:47:43+5:302021-08-13T04:47:43+5:30
............... नियमित पाणी पुरविण्याची मागणी वाशिम : सिव्हिल लाइन भागात काही ठिकाणी चार ते पाच दिवसआड पाणीपुरवठा केला जात ...
...............
नियमित पाणी पुरविण्याची मागणी
वाशिम : सिव्हिल लाइन भागात काही ठिकाणी चार ते पाच दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे पाण्यासाठी भटकंती सुरू असून गैरसोय होत आहे. नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी श्याम जोशी यांनी न.प.कडे गुरुवारी केली.
..............
अवैध प्रवासी वाहतूक जोरात
वाशिम : शहरातून अनसिंग मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सध्या जोरात सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाणाऱ्या अशा वाहनांकडे पोलिसांचेही दुर्लक्ष होत असून हा प्रश्न अधिकच गंभीर होत चालल्याचे दिसत आहे.
..............
अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीची मागणी
वाशिम : शहरातील जुनी आययूडीपी काॅलनी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून पावसाचे पाणी साचत आहे. न.प.ने रस्त्यांची किमान डागडुजी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
..............
सोयाबीन पिकाला पावसाची प्रतीक्षा
वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात अधूनमधून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांची स्थिती तुलनेने चांगली आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून सोयाबीन पिकाला आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
................
कोरोना लसीकरणास प्रतिसाद मिळेना
वाशिम : शहरातील सर्व नागरिकांना कोरोना लस मिळावी, यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले; मात्र अद्याप अधिकांश नागरिकांनी लस घेतलेली नसतानाही लसीकरण शिबिरास विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
...............
वीज देयक वसुलीची मोहीम
वाशिम : शहरातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक विद्युत ग्राहकांकडे असलेला थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर वीज देयक वसुलीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर.जी. तायडे यांनी दिली.
.................
साहित्य विक्रीमुळे वाहतूक विस्कळीत
वाशिम : शहरातून गेलेल्या अकोला-नांदेड महामार्गावर अकोला नाका ते पुसद नाका यादरम्यान विविध साहित्य विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत. त्या ठिकाणी नागरिक थांबत असल्याने दिवसभरातून अनेक वेळा वाहतूक विस्कळीत होत आहे.
................
कोविड केअर सेंटर झाले रिक्त
वाशिम : कोरोना संसर्गाच्या संकटकाळात शहरात विविध ठिकाणी सुरू झालेले कोविड केअर सेंटर सध्या रुग्णच नसल्याने रिक्त झाले आहेत. असे असले तरी तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून एकही सेंटर बंद करण्यात आले नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अविनाश आहेर यांनी सांगितले.