वाशिम जिल्ह्यात व्यवसाय कर विशेष नोंदणी अभियानास सुरूवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 03:10 PM2019-01-14T15:10:45+5:302019-01-14T15:10:58+5:30
वाशिम : महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक यांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभागाच्या वतीने सोमवार, १४ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास सुरूवात झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र व्यवसाय कर कायदा १९७५ अन्वये नोंदणीकृत व नोंदणीकृत नसलेल्या व्यक्ती, मालक यांना व्यवसाय कर नोंदणी प्रक्रियेत सहकार्य करण्यासाठी व्यवसाय कर विभागाच्या वतीने सोमवार, १४ जानेवारीपासून जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियानास सुरूवात झाली. हे अभियान आगामी महिन्यातील ८ फेब्रूवारीपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.
व्यवसाय कर कायद्यांतर्गत नाव नोंदणीकृत, नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तींनी, मालकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरिता ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसाय कर अधिकारी संबंधित व्यवसायाच्या ठिकाणी अथवा परिसराला भेट देणार आहेत. व्यवसायाची नोंद नसल्यास ती यादरम्यान जागेवरच करून दिली जाईल. यासाठी बाजारपेठा, मॉल, व्यवसाय केंद्र, औद्योगिक वसाहती आदी ठिकाणी शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच कार्यालयातही मदत कक्ष उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे जिल्हा व्यवसाय कर अधिकारी सतीश राजगुरे यांनी कळविले.