विद्यार्थ्यांकरिता बसफेरी

By admin | Published: July 5, 2014 10:48 PM2014-07-05T22:48:26+5:302014-07-05T23:51:03+5:30

मानव विकास मिशन अंतर्गत एस.टी.बस सेवा नारळ फोडून सुरू करण्यात आली.

Buzzy for students | विद्यार्थ्यांकरिता बसफेरी

विद्यार्थ्यांकरिता बसफेरी

Next

कोंडाळा महाली : भोयता येथे ४ जुलै रोजी मानव विकास मिशन अंतर्गत एस.टी.बस सेवा दि.अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजुभाऊ चौधरी यांच्या हस्ते नारळ फोडून सुरू करण्यात आली. यावेळी आगारप्रमुख एन.डी.चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
मानव विकास मिशन अंतर्गत मालेगाव ते जोडगव्हाणची एस.टी.बसफेरी बोराळा मार्गे भोयता पर्यंत वाढवून देण्याबाबत ग्रामपंचायतीचे ठराव, शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येची यादी आदी कागदपत्रांची पुर्तता व पाठपुरावा करुन सदर बसफेरी सुरु करण्यात आली.
यावेळी भोयता येथील ग्रामस्थांच्या वतीने राजुभाऊ चौधरी, आगारप्रमुख एन.डी.चव्हाण, चालक वाहक, शिक्षक, आदींचा शाल, ङ्म्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर बसफेरीमुळे ९६ विद्यार्थीनीना शाळेमध्ये येण्या-जाण्याची सुविधा प्राप्त झाली आहे.कार्यक्रमास प्रा. सोलव, मनोहर सुर्वे, विजय राऊत, केशव चौधरी, दिलीप पोले, निळकंठ राऊत यांनी परिङ्म्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामसेवक मधूकर राऊत यांनी मानले.यावेळी पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Buzzy for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.