जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींची पोट निवडणूक; दोन ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक
By नंदकिशोर नारे | Published: October 10, 2023 03:30 PM2023-10-10T15:30:50+5:302023-10-10T15:31:02+5:30
जिल्हा निवडणूक विभागाकडून रिक्त पदांची सुधारित यादी जाहीर
वाशिम : डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती आणि नव्याने स्थापित व सन २०२२ मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ६० ग्रामपंचायतींच्या ७६ रिक्त सदस्यपदांसह ४ थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. रिक्त पदांच्या संख्येमुळे यापूर्वी संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने सुधारित यादी जाहीर केली आहे.
निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील.जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या सुधारित यादीनुसार जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळपीर, कारंजा व मानोरा तालुक्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे सदस्य / थेट सरपंचाच्या जागा रिक्त झालेल्या ६० ग्रामपंचायतीतील ७६ सदस्यांच्या व ४ थेट सरपंचाच्या ग्रामपंचायतीमध्ये असे एकूण ८० रिक्त जागांसाठी पोटनिवडणुका होणार आहेत. शिवाय, मुदत संपलेल्या मंगरुळपीर तालुक्यातील पोटी आणि कारंजा तालुक्यातील कामठवाडा या दोन ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींमधील रिक्त सदस्य व सरपंच पदे
तालुका - ग्रामपंचायती - रिक्त सदस्य पदे - रिक्त सरपंच पदे
वाशिम - ०७ - ११ - ००
मालेगाव - १९ - २५ - ०१
रिसोड - ०३ - ०२ - ०१
मंगरुळपीर - ०८ - १० - ०१
कारंजा - १३ - १६ -०१
मानोरा - १० - १२ -००
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती
१) कामठवाडा, तालुका कारंजा
२) पोटी, तालुका मंगरुळपीर
असा आहे निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशन पत्रे सादर करणे - १६ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३
नामनिर्देशन पत्रांची छाननी - २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून
नामनिर्देशन माघारीची मुदत - २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
चिन्ह वाटप, उमेदवारांची अंतिम यादी - २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजतानंतर
प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया - ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७:३० वाजेपासून ते सायंकाळी ५:३०
मतमोजणी आणि निकाल प्रक्रिया - ६ नोव्हेंबर