वाशिम जिल्ह्यातील ६ ग्रामपंचायतीत सप्टेंबर महिन्यात पोटनिवडणूक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:33 PM2018-08-26T12:33:19+5:302018-08-26T12:34:48+5:30
लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चालूवर्षी मे २०१८ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत काही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या अथवा निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्यानुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस प्रारंभ झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील गोंडेगाव (ता. वाशिम), घोन्सर (ता.रिसोड), पांगरी धनकुटे (ता.मालेगाव), वसंतवाडी (ता.मंगरूळपीर), खांबाळा (ता.मानोरा) आणि झोडगा बु. (ता.कारंजा) या सहा ग्रामपंचायतींमधील सरपंचाचे पद सद्या रिक्त आहे. त्यासाठी आगामी महिन्यातील २६ तारखेला पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाच्या निवडणूकीत सहभागी होवून विजयी होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्या इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली असून मतदारांची मनधरणी केली जात असल्याचे दिसून येत आहे.