उंटाच्या तस्करीची टोळी सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 03:30 PM2019-12-18T15:30:35+5:302019-12-18T15:30:51+5:30
हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे.
- शिखरचंद बागरेचा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : उंटाच्या तस्करीची टोळी पुन्हा सक्रीय झाली असुन वाशिम शहरातुन मंगळवारी पहाटे हिंगोलीच्या दिशेने उंटाचा कळप रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर उंट तेलंगनात कत्तलीसाठी जात असतांना संशय वर्तविण्यात येत असुन जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी याबाबत जिल्ह्यातील ठाणेदारांना सुचना दिलेल्या आहेत.
नागपुर ते औरंगाबाद दु्रतगती महामार्गावरुन किन्हीराजा येथून वाशिमच्याा दिशेने २५ ते ३० उंटाचा कळप रवाना झाला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता सदर उंटाचा कळप कन्हेरगाव, हिंगोली, नांदेडच्या दिशेने महामार्गावरील एमआयडीसी परिसरात असल्याची माहिती मिळाली. याबाबत वाशिम ग्रामीणचे ठाणेदार संजय शिपने यांना माहिती मिळाल्यानंतर चौकशीकरिता कन्हेरगावच्या दिशेने पथक रवाना करीत उंटांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. राजस्थान राज्यातील उंट हा प्राणी महाराष्ट्राच्या वातावरणात जगु शकत नाही तसेच महाराष्ट्रात त्याला प्रवेशाची मुभा नसतांना सुध्दा राजस्थान, मध्य प्रदेश या दोन्ही राज्ये सोडून वाशिम जिल्ह्यापर्यंत उंटाचा जथ्था कसा पोहोचला हा एक मोठा प्रश्न आहे. राजस्थानातील काही तस्करी करणारे लोक, मोलमजुरी करणाऱ्या लोकांना हाताशी धरुन पैशाची आमिश दाखवुन उंटांची चोरी केल्यानंतर त्यांना थेट तेलंगना राज्यातील हैद्राबाद शहरात रस्त्याने पायी पाठविले जातात, अशी माहिती आहे. हैद्राबाद येथे पोहोचल्यानंतर या उंटांची कत्तल करुन त्यांचे मास विकण्यात येते तसेच त्यांच्या चामडयाची तस्करी केल्या जाते, अशी सुध्दा माहिती आहे. मागील वर्षी १२ नोव्हेंबर २०१८ रोजी पातुर येथील वनराई गोशाळेचे संचालक श्रीकांत बोरकर यांनी तब्बल ५८ उंटाचा कळप अडवुन पातुर पोलिस स्टेशनमध्ये संबंधीतांविरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशान्वये बोरकर यांच्या वनराई गोशाळेत या उंटांना ठेवण्यात आले होते. तर असाच एक २० उंटाचा कळप मालेगाव येथील सुभाषचंद्र जैन यांच्या गोशाळेत ठेवण्याचा आदेश दिला होता. सदर दोन्ही प्रकरणात हैद्रबाद येथील जीवदया प्रेमी सुरेंद्र भंडारी, दिनेश अपलीया, माहिप जैन, वनराई गोरक्षण संस्थेचे श्रीकांत बोरकर व विजय बोरकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले होते. पातुर येथील सदर घटनेमुळे राजस्थानातील सदर उंटाची चोरी करुन तस्करी करणाºया टोळीने आता आपला मार्ग बदलला असुन पातुर मार्गे न येता नागपुर - औरंगाबाद दृ्रुतगती महामार्गावरुन किन्हीराजा मार्गे वाशिम शहरातून वर्दळ नसलेल्या रस्त्याव्दारे हिंगोलीच्या रस्त्याने हळुहळु आपला मोर्चा वळविला असल्याचे मंगळवारच्या घटनेवरून दिसून येते.
राजस्थान राज्यातुन वाशिम मार्गे तेलंगना राज्यात जाणाºया उंटाच्या कळपाबाबत माहिती मिळाली असुन याची जिल्ह्याातील सर्व ठाणेदारांना आपण सुचना दिलेल्या आहेत.उंटांना हैद्राबाद येथे नेवुन त्याची कत्तल केल्या जाते अशी माहिती जीवदया प्रेमीकडून मिळाल्यामुळेच आपण याबाबत ठाणेदारांना अशा कळपांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
- वसंत परदेशी
जिल्हा पोलीस अधीक्षक, वाशिम