रोहयो मजुरांसाठी दोन एप्रिलला शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:42 AM2021-03-26T04:42:00+5:302021-03-26T04:42:00+5:30

सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे यासंबंधी पत्रव्यवहार करण्यात आला असून, २ एप्रिलच्या शिबिरात ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांना काम मागणी अर्जाचे ...

Camp for Rohyo laborers on April two | रोहयो मजुरांसाठी दोन एप्रिलला शिबिर

रोहयो मजुरांसाठी दोन एप्रिलला शिबिर

Next

सर्व पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे यासंबंधी पत्रव्यवहार करण्यात आला असून, २ एप्रिलच्या शिबिरात ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवकांना काम मागणी अर्जाचे नमुने घेऊन उपस्थित राहण्याबाबत तत्काळ सूचित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३०, ३१ मार्च व १ एप्रिल रोजी काम मागणी करण्यासाठी गावोगावी दवंडी देण्याची कार्यवाही पूर्ण करावी, मजुरांना काम मागणीच्यावेळी आधार क्रमांक लिंक करण्यात आलेल्या बॅंक पासबुकची छायांकित प्रत देण्याबाबत संबंधितांना अवगत करावे, ग्रामसेवकांनी काम मागणी अर्जाची पोच सर्व संबंधितांना देण्यात यावी, ग्रामपंचायत स्तरावरील २ एप्रिल रोजी होणाऱ्या शिबिरात प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यासाठी पंचायत समिती स्तरावर विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात यावी, ग्रामसेवकांकडून पोच मिळाली नसल्यास मजुरांनी पंचायत समिती स्तरावरील विशेष कक्षाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

...................

हयगय केल्यास कारवाई

याकामी कोणताही कर्मचारी दुर्लक्ष अथवा हलगर्जीपणा करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध मग्रारोहयो कायदा २००५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी. याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Camp for Rohyo laborers on April two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.