गुडमॉर्निंंग पथकाची धडक मोहीम

By admin | Published: October 24, 2016 02:25 AM2016-10-24T02:25:51+5:302016-10-24T02:25:51+5:30

मोहीम जोरात; उघड्यावर शौचास जाणा-यांत धास्ती.

The campaign against the Goodmaning Squad | गुडमॉर्निंंग पथकाची धडक मोहीम

गुडमॉर्निंंग पथकाची धडक मोहीम

Next

वाशिम, दि. २३- जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायती या हणगदरीमुक्त झाल्या असल्या तरी, स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण झाले नाही. उद्दिष्टपूर्तीसाठी गूडमॉनिर्ंग पथकाने उघड्यावर शौचास जाणार्‍यांचे टमरेल जप्त केल्यामुळे ग्रामस्थांनी या मोहिमेची धास् ती घेतली आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात हगणदरीमुक्त गाव मोहिम राबविली जात आहे. या मोहिमेतंर्गत सध्या तालुकानिहाय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, हे पथक उघड्यावर शौचास जाणार्‍या ग्रामस्थांची चांगलीच गोची करीत आहेत. सकाळच्या प्रहरीच जिल्ह्यातील ग्रामस्थांना या पथकाचे दर्शन घडत असून, कारवाईचा धाक व बदनामीच्या भीतीपोटी उघड्यावरील हगणदारीचे प्रस्थ कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळेच सध्या जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायत हागणदारीमुक्त झाल्या आहेत. गावागावात जावून शौचालय नसणार्‍या कुटुंबांच्या भेटी घेतल्या. या प्रयत्नांना जिल्ह्यात चांगले यश प्राप्त झाले.
गेल्या २ ऑक्टोबर रोजी भेटी गाठी स्वच्छतेसाठी या उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी जिल्ह्यातील ६९ ग्रामपंचायती पूर्णपणे उघड्यावरील हागणदारीमुक्त झाल्या हो त्या. यानंतर जिल्हा परिषदेच्या स्वच्छता कक्षाकडून दुसर्‍या टप्प्यात गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले. जिल्ह्यातील कारंजा, मंगरूळपीर, मानोरा, वाशीम, रिसोड व मालेगाव अशा सहाही तालुक्यात तालुकास्तरीय गूडमॉनिर्ंग पथक कार्यान्वित करण्यात आले असून, कारंजा तालुक्यात गूड इव्हिनिंग पथकही कार्यान्वित करण्यात आले आहे. पंचायत समिती स्तरावरील गुडमॉर्र्निंंंंग पथक गावात सकाळी सहा पूर्वीच दाखल होते. या पथकात पुरूष व महिला कर्मचार्‍यांसह संबंधित गावातील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच किंवा सदस्यांचाही समावेश असतो. कोणालाच मागमूस न लागे देता हे पथक गावकुसावर उभे राहून उघड्यावर शौचास जाणार्‍यांची प्रतिक्षा कर ते आणि उघड्यावर शौचास जाणारा पुरुष वा महिलाही आढळून आल्यास त्यांच्या हा तामधील टमरेल जप्त करीत आहे. त्याशिवाय गावांगावात जनजागृती करून लोकांना शौचालय बांधण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात शौचालय बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाच्यावतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या गृहभेटी अभियानाचाही मोठा फरक पडला असून, या अभियानांतर्गत विविध अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकार्‍यांनी सतत लोकांच्या भेटी घेऊन त्यांना स्वच्छ तेचे महत्त्व पटवून दिले. याचा परिणाम म्हणून महिनाभरात जिल्ह्यातील साडे चार हजारांच्या कुटूंबांनी शौचालय बांधून घेतले आहे.

Web Title: The campaign against the Goodmaning Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.