कालवे नादुरुस्त ; सिंचनात अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:55 AM2021-02-25T04:55:55+5:302021-02-25T04:55:55+5:30
००००० सुरकंडी रस्त्यावर खड्डे ; चालक त्रस्त वाशिम : येथून चार किमी अंतरावर असलेल्या सुरकंडी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक ...
०००००
सुरकंडी रस्त्यावर खड्डे ; चालक त्रस्त
वाशिम : येथून चार किमी अंतरावर असलेल्या सुरकंडी रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. हिंगोली रोडस्थित उड्डाणपुलाजवळून सुरकंडी गावाकडे जाणारा रस्ता खड्डेमय झाला आहे. रस्ता दुरूस्तीची मागणी करूनही अद्याप खड्डे बुजविण्यात आले नाहीत.
०००००००
बँकेत ग्राहकांची गर्दी कायम
वाशिम : कोरोनाकाळातही वाशिम शहरातील राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी पतसंस्थेत ग्राहकांची गर्दी होत असल्याचे बुधवार, २४ फेब्रुवारी रोजी दिसून आले. मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याकडे अनेक ग्राहकांचे दुर्लक्ष झाले.
००
येवता येथे पाच कोरोना रुग्ण
केनवड : रिसोड तालुक्यातील नंधाना येथील २, येवता येथील ५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल २३ फेब्रुवारी रोजी पॉझिटिव्ह आला आहे. संदिग्ध रुग्णांची तपासणी केली जात असून, नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने बुधवारी केले.
०००
नालीची दुरवस्था; पालिकेचे दुर्लक्ष
वाशिम : नवीन आययूडीपी कॉलनी परिसरातील काही ठिकाणच्या नाल्यांची दुरवस्था झालेली आहे. यामुळे सांडपाणी जागीच थांबून दुर्गंधी सुटत आहे. वारंवार मागणी करुनही नगर परिषदेकडून नाल्यांची स्वच्छता केली जात नाही.
००
कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
वाशिम : महा-डीबीटी संकेतस्थळावर कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी अर्ज केलेल्या काही शेतकऱ्यांची निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर संकेतस्थळावर कोणती कागदपत्रे सादर करावी, याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी बुधवारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.