रद्द करा, रद्द करा, कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा; वाशिमात राकाँचे आंदोलन
By संतोष वानखडे | Published: September 18, 2023 03:38 PM2023-09-18T15:38:23+5:302023-09-18T15:40:12+5:30
राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढल्याने याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निषेध आंदोलन केले.
वाशिम : राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढल्याने याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निषेध आंदोलन केले. यावेळी कंत्राटी सरकार हाय -हाय, रोजगार द्या, नाहीतर खुच्र्या खाली करा, रद्द करा -रद्द करा, कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा आदी घोषणा देण्यात आल्या.
निवेदनानुसार, राज्यात अनेक पदे कंत्राटी पद्धतीने भरली जात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण सरकारने ठेवले नाही. हि कृतीच मूळात असंवैधानिक आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे, अशी भीतीही वर्तविण्यात आली. कंत्राटी पदभरतीने युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाच्या विरोधात १८ सप्टेंबर रोजी वाशिम येथे दुपारी १ वाजता आंदोलन करण्यात आले. यावेळी रा. काँ. च्या पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
विविध घोषणांनी परिसर दणाणला!
रद्द करा रद्द करा कंत्राटी भरतीचा आदेश रद्द करा, रोजगार द्या नाही तर खुर्च्या खाली करा, भाजपा हटावा -
नोकऱ्या वाचवा, कंत्राटी मुख्यमंत्री भरा, पण नोकऱ्या परंमनंट करा, कंत्राटी सरकार हाय..हाय, रोजगार आमच्या हक्काचा-नाही कोणाच्या बापाचा आदी घोषणा देण्यात आल्या. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.