मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:39+5:302021-03-27T04:42:39+5:30
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर शक्य तितक्या लवकर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने आता १ ...
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटावर शक्य तितक्या लवकर मात करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात लस उपलब्ध करणे आवश्यक ठरणार आहे. यावेळी मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणात अडथळा निर्माण होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्कर्स यांना लस देण्यात आली. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचारी आणि मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व प्रशासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील विविध आजार जडलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांचे लसीकरण केले जाणार आहे.
........................
१४
जानेवारी
जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले
.........
आरोग्यसेवक - पहिला डोस - ९९३, दुसरा डोस - ९९३
फ्रंटलाईन वर्कर्स - पहिला डोस - ४२३, दुसरा डोस - ४२३
ज्येष्ठ नागरिक - ११४०
४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले - ८३५
..............
४५ वर्षांपुढील ५० हजारांवर नागरिकांना करावे लागणार लसीकरण
१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची संख्या ५० हजारांपेक्षा अधिक आहे. या सर्वांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभागाला युद्धस्तरावर तयारी करावी लागणार आहे. तेवढा लसींचा साठादेखील उपलब्ध ठेवावा लागणार आहे.
..................
सध्या जेवढी मागणी तेवढ्या लसी उपलब्ध
१४ जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स, ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. जेवढी मागणी नोंदविण्यात येते, तेवढ्या लसी उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
.................
कोट :
कोरोना लसीकरण मोहिमेत आतापर्यंत तरी कुठलीही अडचण निर्माण झालेली नाही. कोरोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे; मात्र भीतीपोटी अद्याप त्याला म्हणावा तसा प्रतिसाद संबंधितांकडून मिळत नसल्याचे दिसत आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व नागरिकांचे लसीकरण केले जाणार असून, आरोग्य विभाग त्यासाठी सज्ज आहे.
- डाॅ. अविनाश आहेर
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम