लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा : वाशिममध्ये भाजपाचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 05:46 PM2021-04-08T17:46:21+5:302021-04-08T17:46:38+5:30

BJP's Agitation Against Lockdown in Washim : भारतीय जनता पार्टीने ८ एप्रिल रोजी स्थानिक पाटणी चौकात तिव्र आंदोलन केले.

Cancelled lockdown, save traders: BJP's agitation in Washim | लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा : वाशिममध्ये भाजपाचे आंदोलन 

लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा : वाशिममध्ये भाजपाचे आंदोलन 

Next

वाशिम : व्यापारी ,छोटे व्यावसायीक, कामगार, व सर्वसामाण्याचे आर्थिक कंबरडे मोडणाऱ्या अघोषीत लॉकडाऊन विरोधात भारतीय जनता पार्टीने ८ एप्रिल रोजी स्थानिक पाटणी चौकात तिव्र आंदोलन केले. यावेळी लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा यासह महाविकास आघाडीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तर हाती फलक व दंडाला काळीफित लावून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

कोरोनाचा  प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्याची भाषा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात मात्र अघोषित लॉकडाऊन लावले आहे. त्यामुळे व्यापारी ,छोटे व्यावसायीक, नाभिक बांधव, रोजंदारी करून पोट भरणारे रोजगार तथा सर्वसामाण्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहेभारतीय जनता पार्टीने गुरुवारी स्थानिक पाटणी चौकात निषेध आंदोलन केले. जिल्हा महमंत्री नागेश घोपे, नगर परिषदेचे उपाध्यक्ष बापूभैय्या ठाकुर, शहराध्यक्ष राहुल तुपसांडे, तालुकाध्यक्ष प्रल्हाद गोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात लॉकडाऊन हटवा, व्यापारी वाचवा असे फलक व दंडाला काळ्या फिती बांधून राज्यसरकारचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी धनंजय रणखांब , बाळू मुरकुटे,  गणेश खंडाळकर, सुनिल तापडिया, मनिष मंत्री, रामप्रसाद सरनाईक, रामभाऊ ठेंगडे, कपिल सारडा यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Cancelled lockdown, save traders: BJP's agitation in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.