कारच्या अपघातात चिमुकला ठार
By admin | Published: October 8, 2016 02:17 AM2016-10-08T02:17:34+5:302016-10-08T02:17:34+5:30
कनेरगाव - वाशिम मार्गावरील घटना.
कनेरगाव नाका(जि. वाशिम), दि. 0७ - तांत्रिक बिघाडामुळे कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात दीड महिन्याचा चिमुकला ठार झाल्याची घटना कनेरगाव ते वाशिम या राज्य मार्गावरील सायखेडाजवळ ७ ऑक्टोबरला सकाळी १0 वाजताच्या सुमारास घडली. वायचाळ पिंपरी येथील देवीदास प्रल्हाद वायचाळ हे पत्नी सुनिता, एक लहान मुलगी व दीड महिन्याच्या चिमुकल्यासह स्वत:च्या एमएच २८ - सी 0१९८ या क्रमांकाच्या मारुती कारने कनेरगाववरून अकोल्याला जात होते. कारचे स्टेअरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कार झाडावर आदळली. यामध्ये चिमुकला जागीच ठार झाला, तर देवीदास वायचाळ यांचा पाय फ्रॅक्चर झाला व सुनिता वायचाळ यांच्या डोक्याला व तोंडाला जबर मार लागला. लहान मुलीला मार लागली नाही. देवीदास वायचाळ हे वाशिम येथे तर सुनिता वायचाळ यांना अकोला येथे रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. या घटनेची माहिती वायचाळ यांच्या घरी व कनेरगाव येथे कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.