चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:26 PM2017-09-20T19:26:50+5:302017-09-20T19:27:33+5:30
कारंजा लाड (वाशिम) : चालकाचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने झालेल्या कार अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना नागपूर महामार्गावरील खेर्डा ते कारंजा रस्त्यावरील लाहोटी यांच्या शेताजवळ २० सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड (वाशिम) : चालकाचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने झालेल्या कार अपघातात ८ जण जखमी झाल्याची घटना नागपूर महामार्गावरील खेर्डा ते कारंजा रस्त्यावरील लाहोटी यांच्या शेताजवळ २० सप्टेंबरला दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान घडली.
खेर्डा जिरापुरे येथील संदीप गायकवाड यांनी आपल्या कारमध्ये खेर्डा येथील बस फाट्यावरून कारंजा येथे घटस्थापना व ईतर साहीत्य खरेदी करण्यासाठी निघालेल्या ८ प्रवाशांना बसविले. प्रवास करीत असताना खेर्डा कारंजा येथून 3 किलोमिटर अतंरावर असलेल्या लाहोटी यांच्या शेताजवळ वाहन चालकांचे स्टेअरिंगवरील नियत्रंण सुटल्याने गाडी थेट डावीकडून उजवीकडील रस्त्याच्याकडेला प्रविण ठाकरे यांच्या शेतात गेली. या अपघातात चंद्रकला अशोक ताडाम (५०), अशोक चिंतामन ताडाम (४२), छबुताई गायकवाड (४५) हे गंभीर जखमी असून यांच्यावर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार केले व नंतर अमरावती येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. तर चंदा गजानन मडावी (३५), लक्ष्मीबाई दे. पाटील (३०), कार चालक संदीप गायकवाड (२३), आरती गजानन खंडारे (३०) सर्व रा. खेर्डा जिरापुरे हे किरकोळ जखमी झाले. यामधील काही प्रवाशी कारंजा ग्रामीण रूग्णालय व कारंजा येथील खाजगी रूग्णालयात उपचार करीत आहे. अपघाताची माहिती मिळताच सर्वधर्म आपतकालीन संस्थेचे श्याम सवाई यांनी तात्काळ श्री गुरूदेव सेवाश्रम समितीची रूग्णवाहीका व जय गुरूदेव रूग्णवाहीका प्रविण बागडे व श्री गरूदेव रूग्णवाहिकेचे निलीम राठोड यांना मदतीसाठी पाठविले. त्यांनी अपघातग्रस्तांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. अपघात झाल्याची माहिती देउनही पोलीस यत्रंणा एक तासापेक्षा जास्त वेळ ग्रामीण रूग्णालयात पोहोचली नाही.