वाशिम येथे शॉर्ट सर्किटमुळे कारने घेतला पेट; गावकरी मदतीला धावले, ४ लाखाचे नुकसान
By नंदकिशोर नारे | Published: May 1, 2024 07:43 PM2024-05-01T19:43:49+5:302024-05-01T19:44:25+5:30
संभाजीनगर दृतगती मार्गावरील पेडगांव चौकानजिक ही घटना घडली.
वाशिम: कारंजाकडून शेलूबाजारच्या दिशेने येणार्या कारमध्ये शॉट सर्कीट झाल्याने कारने पेट घेतल्याची घटना १ मे रोजी दुपारच्या दरम्यान नागपूर संभाजीनगर दृतगती मार्गावरील पेडगांव चौकानजिक घडली. १ मे रोजी दुपारी २. ४० वाजता ज्ञानेश्वर विष्णू कातडे कारंजावरुन परत शेलूबाजारकडे येत असताना कारच्या समोरच्या बोनटमधून आग गोळे येत असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात आल्याबरोबर त्यांनी कार थांबविली.
तेवढ्यात संपूर्ण कार आगीच्या तावडीत सापडली. आग गावकर्यांच्या मदतीने विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र आग अधिकची वाढत गेली . काही क्षणात संपुर्ण कार जळून खाक झाली. कारमध्ये नगदी २३००० हजार रुपये, काही कपंनीची मोबाईल टॅब,गाडीचे व इतर महत्वाचे कागदपत्रे होती. आगीत एकूण ४ लाखाचे जवळपास नुकसान झाले.