नागपूर-जालना मार्गावर कार खड्ड्यात कोसळली; जीवित हानी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 05:17 PM2017-12-21T17:17:57+5:302017-12-21T17:20:49+5:30
मालेगाव: नागपूर-जालना मार्गावर मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे-डोंगरकिन्ही दरम्यान २० डिसेंबरच्या मध्यरात्री कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मोठा अपघात घडून कारचा अक्षरश: चुराडा झाला.
मालेगाव: नागपूर-जालना मार्गावर मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे-डोंगरकिन्ही दरम्यान २० डिसेंबरच्या मध्यरात्री कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे मोठा अपघात घडून कारचा अक्षरश: चुराडा झाला. सुदैवाने कारमधील लोकांना किरकोळ दुखापत होण्यापलिकडे काही मोठी दुर्घटना घडली नाही.
बुधवार २० डिसेंबरच्या मध्यरात्री नागपूर - जालना राज्य महामार्गावर एमएच-३६ जी, ६४४७ क्रमांकाची कार नागपूरकडून जालनाकडे जात होती. मालेगाव तालुक्यातील पांगरीकुटे ते डोंगरकिन्हीदरम्यान या कारच्या चालकाने समोर असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली २० फुट अंतरावर जाऊन उलटली. यात कारमधील लोकांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने जिवित हानी टळली; परंतु कारची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.