कारपा येथील अंगणवाडीची दुरावस्था
By admin | Published: April 28, 2017 11:43 AM2017-04-28T11:43:07+5:302017-04-28T11:43:07+5:30
दोन अंगणवाडी असून या अंगणवाडीची फार दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे.
कारपा :येथील जि.प.शाळेत दोन अंगणवाडी असून या अंगणवाडीची फार दुरावस्था झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून एका अंगणवाडीचे दरवाजा खिडक्या तुटक्या अवस्थेत असून अद्यापही त्यांची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे तुटक्या दरवाजामधून सुट्टीच्या वेळेस कुत्रे,मांजर अंगणवाडीमध्ये जातात.याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आवश्यकता आहे. अंगणवाडीत काही भांडीकुंडी आहेत , अन्नधान्य सुध्दा आहे ते निट असावे यासाठी अंगणवाडी व्यवस्थीत असणे गरज९चे आहे, तर यावर शासनाकडुन दुरुस्ती करिता निधी येत असतो, पंरतु कित्येक महिने होवुन गेले तरी सुध्दा अंगणवाडीची परिस्थिती जैथे दिसत असल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांनी वरील अंगणवाडीची पाहणी करुन दुरुस्तीकरिता पावले उचलावी अशी मागणी होत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासुन अशीच परिस्थिती पहायला मिळत आहे. तरी संबधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारपा येथील अंगणवाडीची पाहणी करुन दुरुस्ती करीता समोर यावे जेणे करुन अंगणवाडीची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.