पुंजानी यांच्यासह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:39 AM2021-03-24T04:39:53+5:302021-03-24T04:39:53+5:30
यासंदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मौजे भिलखेडा हद्दीतील ...
यासंदर्भात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, मौजे भिलखेडा हद्दीतील भुंखंडावर करण्यात आलेल्या बांधकामप्रकरणी वालई ग्रामपंचायतीच्या अभिलेख्यांची तपासणी करून वस्तूदर्शक अहवाल मागविण्यात येऊन तो तहसीलदारांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार, भुखंड क्रमांक २३ व २४ मध्ये व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्बाबत ठराव क्रमांक ८ मध्ये २९ एप्रिल २०१५ रोजी दिलेल्या बांधकाम परवानगीची नोंद सभा रजिष्टरला नाही. तसेच त्या दिवसाचे सभा रजिष्टर कोरे असल्याचे आढळून आले. यावरून बांधकामाबाबत ग्रामसेवक अनिल ठोकबर्डे यांनी दिलेली परवानगी बनावट व खोटी असल्याचे दिसून येते. तसेच ग्रामसेवक ठोकबर्डे हे वालई ग्रामपंचायत येथे प्रत्यक्षात २९ मे २००६ ते ११ आॅगस्ट २०१५ या कालावधीत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी ग्रामसवेक सतीश देशमुख यांच्याकडे कार्यभार हस्तांतरीत केला. त्यानंतर २८ सष्टेंबर २०१५ रोजी बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपत्र ठोकबर्डे यांनी प्रमाणपत्र मो. युसुफ पुजांनी, मो. रिजवान मो. शफी पुंजानी, रेहान मो. युसुफ पुंजानी, फरिदा बानो पुंजानी यांच्या नावे दिले. याशिवाय सदर क्षेत्र त्यांच्या कार्यक्ष्ोत्रात येत नसताना तसेच ठराव न घेता परस्पर बांधकाम परवानगीचे पत्र ग्रामसेवक ठोकबर्डे यांनी तयार केल्याचे दिसून येते. यामाध्यमातून शासनाची फसवणूक झाली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. त्यावरून पोलिसांनी अनिल ठोकबर्डे, युसुफ पुंजानी यांच्यासह अन्य तीघांविरूद्ध भांदवि ४२०, ४६४, ४६८, ४७०, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला.
.................
कोट :
तहसीलदारांनी एकतर्फी अहवाल तयार करून माझ्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. न्यायालयीन प्रक्रियेवर आपला पूर्ण विश्वास असून माझे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करून दाखवणार आहे. या प्रकरणात माझ्याविरूद्ध राजकीय षडयंत्र रचल्या जात आहे.
युसूफ पुंजानी, कारंजा