बँकांमध्ये रोखीचा तुटवडाच
By admin | Published: June 5, 2017 07:00 PM2017-06-05T19:00:57+5:302017-06-05T19:00:57+5:30
वाशिम: केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन कल्लोळ अद्यापही कायमच आहे. बँकांमध्ये रोखीचा तुटवडा असल्याने अनेक व्यवहार अडचणीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: केंद्राच्या ८ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलन कल्लोळ अद्यापही कायमच आहे. बँकांमध्ये रोखीचा तुटवडा असल्याने अनेक व्यवहार अडचणीत येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१७ रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यामुळे सुरवातीचे चार महिने सर्वच स्तरातील जनता आणि व्यावसायिकांना रोखीच्या तुटवड्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यानच्या काळात शासनाने दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतरही रिझर्व्ह बँकेकडून गरजेनुसार पतपुरवठा करण्यात येत नसल्याने बॅकिंग सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यवहारावर परिणाम झाला. बँकेतील रोखीच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि नोकरदार वर्गाला बसला आणि तो अद्यापही कायम आहे. शासनाच्या धोरणानुसार शासकीय नोकरदारांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने बँकेत जमा होते; परंतु बँकेत खात्यावर वेतनाची रक्कम जमा झाल्यानंतरही संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात विड्रॉल मिळत नाही. त्यामुळे त्यांचे इतर खासगी व्यवहार विस्कळीत झाले आहे. शेतकरी वर्गाचा विचार केल्यास मागील महिन्यापर्यंत सुरू असलेल्या नाफेडच्या तूर खरेदीसह बाजार समितीत विकलेल्या धान्याचा चुकारा काही व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना धनादेशाच्या स्वरूपात मिळत होता. तथापि, बँकेत रोकडच नसल्याने धनादेश वटविणेही अवघड होऊन बसले. ही परिस्थिती बव्हंशी अद्यापही कायमच आहे.