जात पडताळणी अर्ज धूळ खात!

By admin | Published: June 3, 2017 01:56 AM2017-06-03T01:56:45+5:302017-06-03T01:56:45+5:30

कर्मचाऱ्यांची उणीव : केवळ दोन कर्मचारी कायमस्वरूपी

Casting application forms dust! | जात पडताळणी अर्ज धूळ खात!

जात पडताळणी अर्ज धूळ खात!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पूर्वी अकोला येथून चालणाऱ्या जातपडताळणी विभागाचा कारभार सहा महिन्यांपूर्वी वाशिममध्ये सुरू झाला; मात्र आवश्यक कर्मचारीवर्ग देण्यास शासनाने टाळाटाळ चालविल्यामुळे या कार्यालयात जातपडताळणीसाठी येणारे नोकरदार, शालेय विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.
वाशिममधील सामाजिक न्याय भवनातील इमारतीत जात पडताळणी विभागाचा कारभार सुरू झाला आहे. त्याठिकाणी दैनंदिन शेकडो जात पडताळणी अर्ज दाखल होत आहेत. ते निकाली काढण्यासाठी मात्र पुरेसे कर्मचारी देण्यात आलेले नाहीत. म्हणायला, कासार आणि पवार नामक दोन कर्मचारी याठिकाणी कायमस्वरूपी कार्यरत आहेत; परंतु तीन अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांची आणखी आवश्यक असल्याने कामे प्रभावित होत आहे. तीन हजारापेक्षा अधिक अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे.

सध्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यामुळे जात पडताळणीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीत जात पडताळणी विभागात पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे कार्यरत कायमस्वरूपी दोन कर्मचाऱ्यांवरच कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.
- माया केदार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, वाशिम

Web Title: Casting application forms dust!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.