सावधान... मास्क नाही, तर भरा ५०० रुपये दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:16 PM2020-07-11T12:16:14+5:302020-07-11T12:16:24+5:30
तीन दिवसामध्ये हजारो नागरिकांवर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्यावतिने राबविण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या पृष्ठभूमिवर जिल्हा प्रशासनाच्यावतिने वारंवार सूचना देवूनही मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुध्द जिल्हा पोलीस विभागाच्यावतिने गत तीन दिवसांपासून धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तीन दिवसामध्ये हजारो नागरिकांवर जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनच्यावतिने राबविण्यात आलेल्या कारवाईत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लॉकडाऊन लागल्यापासून पोलीस विभागाच्यावतिने ४३१६ जणांकडून नियमांचे उल्लंघन प्रकरणी १३.७७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये विना मास्क, वाहतुक नियमांचे पालन न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनासह ईतर मुद्यांचा समावेश आहे. तसेच संचारबंदीमध्ये काहीही काम नसतांना शहरातून फिरणाºया वाहनांवरही कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रिपल सीट जाणाºया ८७२ दुचाकी वाहनांवर कारवाई तर ८९५ वाहने जप्त करण्यात आली. या मोहीमेमुळे नागरिकांनी धास्ती घेतली.
जिल्हयातील सर्व ठाणेदारांना कारवाईचे आदेश
कोरोनाच्या पृष्ठभूमिवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची हयगय न करता कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेसी यांनी सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना दिल्याने सर्वत्र कारवाई मोहीम सुरु आहे.
अनेकांची पंचाईत
जिल्हाभर पोलीस विभागाच्यावतिने सुरु करण्यात आलेल्या धडक कारवाईमुळे अनेक जण आपल्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना फोन लावून गाडी पकडल्याचे सांगतात. अशावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी फोन घेण्यास टाळत असल्याने कार्यकर्त्यांसमोर संबधितांची पंचाईत होत आहे
जिल्हावासियांचे आरोग्य अबधित रहावे याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतिने कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नागरिकांनी सहकार्य करुन नियमांचे पालन करा. जिल्हयात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण पाहता नागरिकांनी मास्कचा वापर करा, विनाकारण बाहेर पडू नका. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे.
- वसंत परदेसी,
पोलीस अधीक्षक, वाशिम