कुठलाही गैरसमज न बाळगता काेविड लस घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:22+5:302021-03-04T05:19:22+5:30
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील मधुमेह व हृदयविकार संबंधित रुग्णांना कोविशिल्ड लस देण्यात येत ...
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील मधुमेह व हृदयविकार संबंधित रुग्णांना कोविशिल्ड लस देण्यात येत असून कोरोनाचा सामना करण्यासाठी कुठलाही गैरसमज न बाळगता सर्वांनी कोविशिल्ड लस घ्यावी, असे आवाहन आचार्य विजयप्रकाश दायमा यांनी बुधवारी केले. ३ मार्च रोजी माँ गंगा बाहेती हॉस्पिटल येथे आचार्य दायमा यांनी कोरोना लस घेतली. याप्रसंगी दायमा यांनी आरोग्य विभागातील सर्व टीमचे कौतुक केले.
माँ गंगा बाहेती हॉस्पिटल येथे साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
तिसऱ्या टप्प्यामध्ये राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. दायमा यांनी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून कुणीही याबाबत गैरसमज न बाळगता जवळच्या आरोग्य केंद्रात तसेच खाजगी रुग्णालयात जाऊन लस घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी माँ गंगा बाहेती हॉस्पिटलचे संचालक डॉ. हरीश बाहेती, डॉ. सरोज बाहेती, सुनील गट्टाणी, नीलेश सोमाणी, विशाल दायमा, हनुमान दायमा, सागर दायमा व हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाविरोधात केंद्र व राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. माँ गंगा बाहेती हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यापूर्वी उच्च रक्तदाब, शुगर व ऑक्सिजनची मोफत तपासणी करण्यात येत असून केंद्र व राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी ही लस घेतली पाहिजे, असे आवाहन बाहेती हॉस्पिटलचे संचालक डॉ. हरिष बाहेती व डॉ. सरोज बाहेती यांनी केले.