समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सीसीटीची कामे वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:42 AM2021-03-31T04:42:05+5:302021-03-31T04:42:05+5:30
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांत येथे कृषी विभाग, महसूल विभागासह सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या ...
समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांत येथे कृषी विभाग, महसूल विभागासह सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या कामांना सुरुवात करण्यात आली असून, लोकसहभागातून ही कामे केली जात आहेत. कारंजा तालुक्यातील जानोरी, दोनद बु. विळेगावसह मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे सीसीटीची कामे होत आहेत. त्यात तपोवन येथे सामाजिक वनीकरणकडून २० हेक्टर क्षेत्रावर, तर कारंजा तालुक्यातील विळेगाव येथे १० हेक्टर क्षेत्रावर सीसीटीची कामे केली जात आहेत. विळेगाव येथे ग्रामसचिव वडते, गावकरी व जलमित्र रवी घुले व राजुभाऊ घुले यांच्या पुढाकारातून कामे केली जात आहेत तर तपोवन येथे सरपंच शरदराव येवले, सामाजिक वनीकरणचे अधिकारी अब्दुल अकिल, ग्रामपंचायत सदस्य अनिल येवले, दिपक येवले, भिवाजी इंगळे चंद्र्रकांत येवले, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश सावळे, प्रज्वल येवले आदिंच्या मार्गदर्शनात ही कामे होत आहेत.