समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सीसीटीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:25+5:302021-03-15T04:37:25+5:30

वाशिम : पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेतील कामांना मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात सुरुवात झाली असून, यात सीसीटीची कामे प्राथमिक ...

CCT works under Samriddh Gaon Competition | समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सीसीटीची कामे

समृद्ध गाव स्पर्धेंतर्गत सीसीटीची कामे

Next

वाशिम : पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेतील कामांना मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात सुरुवात झाली असून, यात सीसीटीची कामे प्राथमिक टप्प्यात करण्यात येत आहेत. त्यापैकी मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे २० हेक्टरवर सीसीटीच्या कामांना शनिवारी सुरुवात करण्यात आली. यासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे सहकार्य मिळत आहे.

समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी गावांमध्ये कृषी विभाग, महसूल विभागासह सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या कामांना सुरुवात करण्यात आली असून, लोकसहभागातून ही कामे केली जात आहेत. त्यात तपोवन येथे सामाजिक वनीकरणकडून २० हेक्टर क्षेत्रावर सीसीटी कामांना सरपंच शरदराव येवले, सामाजिक वनीकरणचे अधिकारी अब्दुल अकिल, ग्रामपंचायत सदस्य अनिल येवले, दीपक येवले, भिवाजी इंगळे, चंद्रकांत येवले, ग्रामपंचायत कर्मचारी दिनेश सावळे, प्रज्वल येवले व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. या कामांसाठी सामाजिक वनीकरणकडून ३ जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Web Title: CCT works under Samriddh Gaon Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.