वृक्षारोपण करून बुध्द पौर्णिमा साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:43 AM2021-05-27T04:43:49+5:302021-05-27T04:43:49+5:30

मानवांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या परिसरात वृक्ष असणे फार गरजेचे असल्याने प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लाऊन त्यांचे ...

Celebrate Buddha Pournima by planting trees | वृक्षारोपण करून बुध्द पौर्णिमा साजरी

वृक्षारोपण करून बुध्द पौर्णिमा साजरी

Next

मानवांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्या परिसरात वृक्ष असणे फार गरजेचे असल्याने प्रत्येक कुटुंबाने किमान एक झाड लाऊन त्यांचे योग्य संगोपन करा, असा उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. २६ मे रोजी सकाळी ८ वाजता आनंद बुध्द विहार, अकोला नाका वाशिम येथून ऑनलाईनवर बुध्द वंदना घेण्यात आली. काटा या गावी हरिदास बन्सोड यांच्या शेतात हरिश्चंद्र जि. पोफळे व अरविंद उचित यांनी वृक्षारोपण केले. तसेच मंगरूळपीर येथील नागी गावात शालिग्राम चुंबळे, शंकर चुंबळे, विष्णू भगत, विनोद चुंबळे, ज्ञानदेव उंदरे, गुलाब कांबळे, नम्रता चुंबळे, खुषी चुंबळे यांनी स्मशानभूमीत जाऊन वृक्षारोपण केले. मालेगाव येथील चिवरा, करंजी येथे छगन सरकटे, प्रकाश सरकटे, महादव सरकटे, सुधाकर कांबळे यांनी वृक्षारोपण केले. कारंजा येथे हर्षल इंगोले यांनी वृक्षारोपण केले. तसेच अनेक कुटुंबांनी वृक्षारोपण केले. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने हरिश्चंद्र पोफळे व भीमराव चव्हाण यांनी प्रवचन केले. यावेळी हरिदास बनसोडे, पंढरी खिल्लारे, संजय सोनोने तसेच ऑनलाईनवर बहुसंख्येने बौद्ध बांधव हजर होते. अध्यक्षीय भाषणात सि. दा. भगत यांनी मागीलवर्षी बुध्द जयंतीपासून पावसाळा येईपर्यंत चिमणी-पाखरे, पशुपक्षी यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचा उपक्रम राबविला होता. ते चालू आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाने एक झाड लाऊन संगोपन करावे, असे आवाहन केले आहे. प्रास्ताविक हर्षल इंगोले यांनी व आभार प्रदर्शन प्रमोद बेलखेडे यांनी केले.

Web Title: Celebrate Buddha Pournima by planting trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.