रामनवमी घरातच साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:40+5:302021-04-22T04:41:40+5:30

दरवर्षी रामनवमीला दर्शनासाठी भाविक गर्दी करतात; परंतु कोरोनाचे सावट असल्यामुळे परिसरातून जाणारे भक्त लांबूनच दर्शन करून पुढे जात ...

Celebrate Ram Navami at home | रामनवमी घरातच साजरी

रामनवमी घरातच साजरी

googlenewsNext

दरवर्षी रामनवमीला दर्शनासाठी भाविक गर्दी करतात; परंतु कोरोनाचे सावट असल्यामुळे परिसरातून जाणारे भक्त लांबूनच दर्शन करून पुढे जात होते. कोरोनाचे सावट असल्यामुळे सर्व यात्रा, जत्रा आणि उरूस साजरे करण्यास शासनाने बंदी घातली आहे तसेच परिसरातील सर्व मंदिरे भक्तांसाठी बंद करण्यात आली आहेत. संचारबंदी लागू असल्यामुळे अत्यावश्‍यक सेवावगळता इतरांना घरातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. रामनवमीवरदेखील कोरोनाचे सावट असल्याचे चित्र दिसून आले. शहरातील राममंदिर म्हणजे रामभक्तांचे श्रद्धास्थान आहे. रामनवमीला याठिकाणी उत्सव साजरा केला जातो परंतु रामनवमीला मंदिराचे पुजारी आणि मोजक्या भाविकांच्या उपस्थितीतच जन्मकाळ सोहळा पार पडला. त्यानंतर दिवसभरात मोजक्‍याच भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. कोरोनाचे सावट असल्यामुळे भक्तांविना रामनवमी साजरी केल्याचे चित्र येथे दिसले. शहराबरोबरच ग्रामीण भागात साजरा होणारा राम जन्मोत्सव सोहळा यंदा दिसला नाही.

Web Title: Celebrate Ram Navami at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.