रमजान ईदचा सण घरातच साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:28+5:302021-05-14T04:40:28+5:30

यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदकरिता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच ...

Celebrate Ramadan Eid at home | रमजान ईदचा सण घरातच साजरा करा

रमजान ईदचा सण घरातच साजरा करा

googlenewsNext

यासंदर्भातील आदेशात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदकरिता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच ईप्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून ‘ब्रेक द चेन’ आदेशाचे काटेकोर पालन करावे. नमाज पठणाकरिता मशिदीत तसेच मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये. जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असल्याने दुकाने, बाजारपेठा बंद आहेत. कडक निर्बंधातून मुभा दिलेल्या केवळ अत्यावश्यक सेवांच्या दुकानातून घरपोच सुविधेद्वारे खरेदी करता येईल.

कोविड-१९ या विषाणूच्या वाढत्या संसर्गास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने राज्यात फौजदारी दंड संहिता कलम १४४, संचारबंदी लागू आहे. त्यामुळे या कालावधीत फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नये, तसेच नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये. रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

.........................

बाॅक्स :

प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना

धार्मिक स्थळे बंद असल्याने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र रमजान ईद साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने प्रभावी जनजागृती करावी. रमजान ईदच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील.

......................

नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई

या आदेशाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध मुख्य सचिव, महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र शासन यांच्या आदेशात नमूद आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ नुसार तसेच साथरोग अधिनियम १८९७ अन्वये दंडनीय तथा कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Web Title: Celebrate Ramadan Eid at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.