गुराखी समाजात गायी-वासरांना ओवाळून केली जाते दिवाळी साजरी
By admin | Published: October 27, 2016 03:09 PM2016-10-27T15:09:34+5:302016-10-27T15:09:34+5:30
गुराखी समाजामध्ये दिवाळीचा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. गुराख्यांची दिवाळी ही धनत्रयोदशीपासून सुरु होते.
Next
ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २७ - दिवाळी हा संपूर्ण देशात हर्षोउल्हासात साजरा करण्यात येणारा सण. हा सण देशात हजारो वर्षांपासून साजरा करण्यात येत असून, प्रत्येक समाज व धर्माची एक वेगळी परंपरा आहे. ही परंपरा प्रत्येक समाज व धर्म अजूनही जपत आहे. शहरी भागात जरी हा सण साजरा करताना एकरूपता दिसत असली तरी ग्रामीण भागात अजूनही विविध धर्मांचे वेगळेपण दिसते आहे.
गुराखी समाजामध्ये दिवाळीचा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो. गुराख्यांची दिवाळी ही धनत्रयोदशीपासून सुरु होते. गुरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुराखी गायी - वासरांना ओवाळतात, त्यांची पूजा करतात. त्यांना ओवाळण्याकरीता दिवटी तयार केली जाते. धनत्रयोदशीपासून गुराख्यांकडे लव्हाळीची दिवटी बनवायला प्रारंभ होतो. लव्हाळी म्हणजे उंच वाढणारे गवत. त्या गवताच्या काडयांपासून सुबक दिवटी विणली जाते. मोहदळ गवतापासून गुराखी पशुधनाकरिता सजावटीचे दागिने तयार करतात. गवताचा सहा फूट उंचीच्या काडयांवर सुतळा व रंगबेरंगी लोकर गुुुंफून पट्टे बनविल्या जातात. दररोज गायीच्या माथ्यावर दही लावून तर म्हशीच्या पुढल्या पायांवर दहयाचा चंद्र आणि मागच्या पायावर सूर्य काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवसात गुराखी महिला पाच दिवस शेणापासून तयार केलेल्या लहान लहान पुतळयाची पुजा करतात.