वाशिम जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांत वाचन प्रेरण दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:37 PM2018-10-15T16:37:46+5:302018-10-15T16:38:27+5:30
वाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन हा १५ आॅक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून शाळा, महाविद्यालयांत साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन हा १५ आॅक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून शाळा, महाविद्यालयांत साजरा करण्यात आला.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धींगत करण्याच्या दृष्टिने शाळा, महाविद्यालयांत विविध उपक्रम साजरे करण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी कामकाजाच्या वेळेत अर्धा तास वाचन केले. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन प्रेरणा किंवा वाचन संस्कृतीशी संबंधित विषयावर व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद घेण्यात आले. काही शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय व इतर संस्थांनी आपल्या परिसरात ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचन कट्टा’ स्थापन केला. राठी विधी महाविद्यालय वाशिम येथे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी ग्रंथपाल संजय इढोळे यांनी पुस्तकाचे व वाचनाचे महत्व विषद करण्यासाठी डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा स्थापन केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नजीर अली कादरी तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.सुशांत चिमणे, प्रा.एल.डी.दाभाडे, भाग्यश्री धुमाळे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.कादरी यांच्यासह मान्यवरांनी विचार व्यक्त केले. विद्यार्थी शुभम लुंगे याने पुस्तकाचे वाचन केले. या कार्यक्रमानंतर गं्रथालयात वैविध्यपूर्ण पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते.